ताज्या घडामोडी

सांगोल्यात ‘निकाल’च्या दिवशीच वाहतुकीचा निकाल! मिरज रोड बोगद्याच्या कामामुळे बायपासवर वाहनांची प्रचंड कोंडी

मिरज रोड पुलाच्या कामामुळे वाहतुकीचा फज्जा;

सांगोला /विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो .9881583935

 

सांगोला शहरातील मिरज रोडवरील रेल्वे पुलाच्या (बोगद्याच्या) दुरुस्तीचे काम गेल्या काही काळापासून सुरू या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.  

सांगोला शहरात आज एकीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाची धावपळ सुरू असतानाच, दुसरीकडे मिरज रोड ते महुद नाका दरम्यान झालेल्या भीषण वाहतूक कोंडीने प्रवाशांचे आणि प्रशासनाचे हाल बेहाल केले आहेत. मिरज रोडवरील रेल्वे पुलाचे (बोगद्याचे) काम प्रलंबित असल्याने सर्व भार पर्यायी बायपासवर पडला असून, प्रशासनावरील कामाचा व्याप आज दुपटीने वाढलेला पाहायला मिळाला.

प्रशासकीय यंत्रणेची दुहेरी ओढाताण

काल निवडणूक निकाला दिवशीच संपूर्ण पोलीस फौजफाटा आणि प्रशासकीय यंत्रणा मतमोजणी केंद्र व कायदा सुव्यवस्था राखण्यात व्यस्त आहे. नियोजनाअभावी मिरज रोडकडून येणारी जड वाहतूक बायपासवर अडकल्याने महुद नाका ते मिरज रोड रेल्वेगेट बायपास रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. निकालाच्या उत्साहात बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनाही या वाहतुक कोंडीचा मोठा फटका बसला.

बायपास ठरतोय ‘डोकेदुखी’

रेल्वे बोगद्याचे काम संथ गतीने सुरू असल्याचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. बायपास रस्ता हा वाढत्या वाहतुकीसाठी अपुरा पडत असून, कालच्या निकालाच्या महत्त्वाच्या दिवशी तिथे वाहतूक नियंत्रक नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. प्रशासनाना निवडणूकीच्या कामाचा व्याप असताना त्यात वाहतुक कोंडीचाही व्याप ही दुपटीने वाढाला आहे.  स्त्यावरील कोंडी सोडवण्यासाठी जादा कुमक तैनात करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नागरिकांचा संताप

वेळेचा अपव्यय: निवडणुकीच्या निकालामुळे मुख्य रस्ता बंद असल्याने प्रवाशांना शहराला मोठा वळसा घालून जावे लागत लागले. जर काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर आगामी काळात ही कोंडी अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ं”एकडे निकालाची उत्सुकता आहे, पण रस्त्यावर तासनतास अडकून पडावे लागले. प्रशासनाने कामाचे नियोजन करताना निकालाच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घ्यायला हवी होती,” अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. आता संबंधित प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??