सांगोला तालुक्यात दररोज विनापरवाना वृक्षतोड,पडद्या मागून अवैधरीत्या वृक्षतोड विक्रीचा गोरख धंदा करणाऱ्या दादाला अभय कोणाचा!

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख गप्प का?
तालुक्यामधूंन जोरदार चर्चा.
सांगोला विशेष प्रतिनिधी विकास गंगणे मो.981583935
दिवसेंदिवस चर्चेत असलेले सांगोला वनविभाग थंडावला असून,या अगोरचे सांगोला वनविगाचे संबंधित अधिकारी तुकाराम जाधवर असताना तालुक्यात विनापरवाना वृक्षतोड वाहतूक होत नसायची, विनापरवाना वृक्षतोड व वाहतूक करायची असेल त्याचा पास आवश्यक आहे ते वारंवार सांगायचे, परंतु विनापरवाना वृक्षतोड वाहतूक केल्यास वनविभागातील टीम सोबत घेऊन, त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून कायदेशीर कारवाई करायचे .व वनपरिक्षेत्रात हद्दी सिमेंट पिलेर उभा केल्याने अतिक्रमणे काढून, विना परवाना वृक्षतोड ,वाहतू करणाऱ्यावरती दोन वर्ष चाळीस दिवसात वीस लाखाच्या दरम्यान पावती केली.तसेच १ पिक अप,१ मोटारसायकल सरकारी जमा केली,हे ही आजी माजी आमदार व डॉ.बाबासाहेब देशमुख यांना ही माहिती आहे.जाधवर साहेब सांगोल्यात काम करीत असताना कुठलाही राजकीय पक्ष पात न मानता ,कोणत्या पुढार्यांना न जुमानता धाडसी निर्णय घेतला होता.दोन वर्षात झाडांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्याठिकाणी लाकुड तोड व्यापारी मोठ्या प्रमाणात फोफावला आहे.परंतु तुकाराम जाधवर साहेब यांनी कमरेच्या त्रासामुळे विनंती बदली अर्ज केल्याने ,यांची बदली २ वर्षाच्या नंतर बारामती येथे सामाजिक वनीकरण येथे झाली.,त्या ठिकाणी सांगोला वनविभाग नुतन साहेब सागर मगर आल्यापासून तालुक्यात भरदिवसा विनापरवाना वृक्षतोड वाहतूक होत असताना याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात असून, तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना विनापरवाना वृक्षतोड तालुक्यात भर दिवसा होत असल्याची माहिती असून देखील गप्प का? त्यांच्यावर कारवाई का? होत नाही, आमदारांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे अशी चर्चा तालुक्यातील सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.



