ताज्या घडामोडी

१२१ वर्षांच्या आयुष्याला पूर्णविराम! भुसनर कुटुंबातील ज्येष्ठ आधारवड हरपला

तुकाराम भुसनर यांच्या मातोश्रींच्या निधनाने डिकसळ परिसरात शोककळा

सांगोला विशेष प्रतिनिधी

विकास गंगणे 

मो.9881583935

 

डिकसळ (ता. सांगोला) येथील मा.तुकाराम गणपती भुसनर यांच्या मातोश्री कै. केराबाई गणपती भुसनर यांचे वयाच्या १२१ व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भुसनर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून डिकसळ गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

केराबाई भुसनर यांनी आपल्या दीर्घ आयुष्यात अनेक पिढ्या पाहिल्या. नातवंडे, पतवंडे आणि खापरपणतवंडे असा मोठा परिवार त्यांच्या मागे आहे. कुटुंबातील अनेक पिढ्यांना प्रेम, माया आणि आशीर्वाद देणाऱ्या केराबाई यांच्या निधनाने कुटुंबीयांनी आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ आधारवड गमावला आहे.

 

त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून भुसनर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात येत आहे.

 

कै. केराबाई गणपती भुसनर यांच्यावर आज गुरुवार, सकाळी १० वाजता डिकसळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??