सांगोल्याचा वनविभाग असुन अडचण, नसून खोळंबा, वनविभागाचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर.

विशेष प्रतिनिधी/विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यातील अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये व, ज्यास्त जोमात म्हणजे जवळा घेरडी परीसरात भरदिवसा बेकायदेशीर वृक्षतोड जोमात असून, तेथील संबंधित अधिकारी यांना हाताशी जवळ धरून मंथली ठरलेली रक्कम त्या व्यापारी कडून दिले जात असल्याची चर्चा तेथील नागरीकामंधून होत आहे.
सांगोला तालुक्यातील येणाऱ्या अंतर्गत गावातील शेतात बेकायदेशीर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात चालू असून , भर दिवसा वनविभागाच्या नाकावरती टिचून बेकायदेशीर वृक्षतोड करून वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने केली जात आहे?अशी चर्चा सर्वसामान्य नागरीकांमधून होत आहे.ज्या ठिकाणी वृक्षतोड व वाहतूक बेकायदेशीरपणे होत असताना, ते नेमून दिलेले कर्मचारी त्या दिवशी कोठे असतात? असा विषयी चर्चेचा बनलेला आहे. या होणाऱ्या नुकसानीचे कोणालाच काही देणे घेणे राहील्याची परिस्थितीती निर्माण झाली आहे.बेकायदेशीर व्यवसाय म्हणजे वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांना मंथली हप्ता असल्याने ही यंत्रणा चांगलीच कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.या’अगोदरचे सांगोला वनविभागाचे संबंधित अधिकारी तुकाराम जाधवर हे सांगोल्यात असताना, कोणत्याही पुढार्यांना न जुमानता कायद्याची चौकट धरून बेकायदेशीर वृक्षतोड व वाहतूक करणाऱ्या वरती त्यांच्यावर रीतसर शासनाच्या पावती देऊन दंडात्मक कारवाई केली.
तसेच याअगोदर ग्रामीण भागात बेकायदेशीर वृक्षतोड व वाहतूक करण्याची धाडस नसायचे,परंतु गेल्या महिन्यापासून सांगोल्यातील आसपासच्या गावांतून बेकायदेशीर वृक्षतोड वाहतूक करताना दिसत आहेत.
कायदा सुव्यवस्था मोडण्याचे दिसून येते आहे.असे हा प्रकार होत असताना बेकायदेशीरपणे वृक्षतोड व वाहतूकीला आळा घालण्यासाठी , वृक्षतोड व्यापारी कडून मंथली हप्ता दिला जातो, असे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.परंतू कारवाई करतो म्हणायची अशी या वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून होत आहे.मात्र बेकायदेशीर वृक्षतोड व वाहतूक सुरू असल्याचे चित्र तालुक्यात अनेक ठिकाणी होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे वृक्षतोड हा व्यवसाय तालुक्यात सर्वत्र वाढीस लागण्यास वनविभाग यंत्रणाही तितक्यात जबाबदार असल्याचे दिसून येते.बेकायदेशीर वृक्षतोड करण्यासाठी वन विभागाकडून कठोर नियम केले जात आहे.तरीही या नियमाची अंमलबजावणी या तालुक्यात होत नाही.
तरी सांगोला तालुक्यात चाललंय तरी काय ,याला आशीर्वाद कोणाचा? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
परंतु तालुक्याच्या आमदारांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे अशी चर्चा तालुका वाशी यामधून होत आहे.



