जवळा ग्रामपंचायत सचिवालयाचा ध्वजारोहण सफाई कामगारांच्या हस्ते संपन्न.

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
जवळा गाव व जवळा ग्रामपंचायत नेहमीच आदर्श ठरते आहे, थोर महापुरुषांचा विचार आणि वसा घेऊन काम करीत असताना विधान परिषदेचे माजी आमदार माननीय दिपक आबा साळुंखे- पाटील यांच्या कल्पनेतून विविध विकास कामे होत असताना, आज ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सज्जन मागाडे यांनी ध्वजारोहणाचा मान बाजूला ठेवून गावची स्वच्छता करून नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ग्रामपंचायतीचे सफाई कामगार यांना ध्वजारोहणाचा मान दिला. त्यामुळे सफाई कामगारांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसांडून वाहत होता आणि सफाई कामगारांना ध्वजारोहण दिल्यामुळे गावातील नागरिकांकडून ग्रामपंचायतीचे व सरपंच यांचे कौतुक करण्यात येत होते.
यावेळी जि. प. प्राथ. मुलींची शाळा, जवळा यामधील विद्यार्थिनींनी तालासुलावरती कवायती सादर केल्या, तसेच अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांनी देशाविषयी आपली भाषणे सादर केली. सरपंचांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक वृंद, नागरिक यांना 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व खाऊ वाटपानंतर कार्यक्रम संपन्न झाला.



