सांगोल्यात उत्पादन शुल्क विभागाच्या त्या कर्मचाऱ्याची नको तिथे दादागिरी; बातमी येताच फरार, वरिष्ठ कारवाई कधी करणार? नागरीकामधूंन चर्चा

सांगोला/विशेष प्रतिनिधी – विकास गंगणे (९८८१५८३९३५)
सांगोला तालुक्यातील अनकढाळ (नाझरे) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका कर्मचाऱ्याने अधिकार नसताना अवैधरित्या धंद्याच्या ठिकाणी जाऊन संबंधित व्यावसायिकांना केसेस करण्याची भीती दाखवत दमदाटी करून पैशाची उकळपट्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धिंगाणा घालून त्या कर्मचाऱ्याने गावातून धूम ठोकल्याचे सांगण्यात येत आहे.
हा प्रकार गावात उघडकीस येऊन पोलिस टाईम्स लाईव्ह न्यूज नेटवर्क मध्ये बातमी प्रसिद्ध होताच उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली असून त्यांनी चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
मात्र धिंगाणा घातल्यापासून संबंधित कर्मचारी फरार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
असे जर कर्मचारी काही चुकीचे करत असतील तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यामध्ये तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा आणि प्रश्न जनतेमधून व्यक्त होताना दिसत आहे.
–



