ताज्या घडामोडी

घेरडी जिल्हा परिषद गटात सौ संगीता सोमा (आबा) मोटे यांच्यासाठी महिलांचा झंजावाती प्रचार मतदारांचा प्रचंड प्रतिसाद

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचा धूरळा उडत आहे त्या अनुषंगाने घेरडी जिल्हा परिषद गटांमध्ये सौ संगीता सोमा(आबा) मोटे या आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या सांगोला तालुका विकास आघाडीचे उमेदवार आहेत.

घेरडी जिल्हा परिषद गटामध्ये प्रचार चालू झाल्यानंतर सौ संगीता सोमा(आबा) मोटे यांचा प्रचार गावातील महिलांनी चालू केला त्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे 

सौ संगीता सोमा(आबा) मोटे या राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या संचालिका असून त्यामार्फत त्यांनी हजारो बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे त्यातून महिलांनी विविध व्यवसाय भरून स्वतःच्या संसाराचा गाडा सुखाने चालवीत आहेत त्याचाच फायदा त्यांना प्रचारात दिसून येतो 

संगीता मोटे या घेरडीचे भूमिपुत्र सोमा(आबा) मोटे यांच्या पत्नी असून सोमा(आबा) मोटे यांचे समाजसेवेचे मोठे कार्य आहे सोमा (आबा) मोटे हे रात्री अपरात्री संकटकाळी धावून येणारा माणूस व संकट मोचक म्हणून परिसरात चर्चेत आहेत त्यांच्या पत्नीस मिळालेली उमेदवारी ही घेरडी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक मतदाराची उमेदवारी आहे असे मतदारांमधून बोलले जात आहे 

कोरोना या महामारीच्या संकटात सोमा (आबा) मोटे हे रात्रंदिवस नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध होते घेरडी गावांमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर सोमा (आबा) मोटे आणि स्वतः गावातील प्रत्येक कुटुंबाला अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले होते यावेळी नागरिकांनी सोमा (आबा) मोटे यांचे आभार मानले होते त्या आभारातून उतराई होण्यासाठी आता नागरिक स्वतःहून सोमा (आबा) मोटे यांच्या पत्नीला मतदान करणार आहेत त्याचाही फायदा त्यांना या निवडणुकीत होताना दिसत आहे 

घेरडी हंगिरगे पारे नराळे डिकसळ हबीसेवाडी गावडेवाडी तरंगेवाडी भोपसेवाडी आगलेवाडी बुरंगेवाडी सोनंद डोंगरगाव आणि गळवेवाडी या गावांमध्ये कॉर्नर सभा व बैठका घेऊन महिलावर्गांनी मोठ्या प्रमाणात संगीता सोमा (आबा) मोटे यांचे विचार पटवून सांगितल्याने त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होणार आहे 

सोमा (आबा) मोटे यांची घेरडी जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीसोबत चांगले संबंध असल्याने ते निवडणुकीत चांगल्या मताधिक्यांनी निवडून येणार असल्याचे नागरिक आपसात चर्चा करत असल्याचे दिसून येते 

सोमा (आबा) मोटे हे घेरडी ग्रामपंचायत सदस्य असून त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतचा कारभार चालत असल्याने त्यांनी घेरडी गावांमध्ये भरपूर विकास केला आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी महादेव मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास मध्ये समाविष्ट केला आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून रस्ते पाणी वीज आरोग्य या समस्या पूर्ण केल्या आहेत आणि यापुढेही त्यासाठी ते विशेष प्रयत्न करणार आहेत त्यांनी घेरडी गावातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेवर स्वतंत्र बोरवेल घेऊन पाण्याची सोय जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना करून दिली आहे 

ग्रामपंचायत च्या माध्यमातून सोमा (आबा) मोटे यांनी भरपूर विकास कामे केली असल्याने त्यांचा विजय पक्का मानला जात आहे 

लोकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध असणारे सोमा (आबा) मोटे म्हणून परिसरात परिचित आहेत आता सुद्धा त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी 24 तास प्रचार केला आहे त्यांचे विविध संघटनांशी चांगले संबंध असून त्यांना पाठिंबा वाढत आहे सोमा (आबा) मोटे हे वैचारिक नेते म्हणून सर्वश्रुत आहेत याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत होणार आहे 

सौ संगीता सोमा (आबा) मोटे यांना कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यांचा विजय पक्का मानला जात आहे

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??