घेरडी जिल्हा परिषद गटात परिवर्तनाचे वारे; संगिता मोटे यांचा झंझावती प्रचार

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
हो.9881583935
घेरडी जिल्हा परिषद गटातून , शेतकरी कामगार पक्षाचे आमदार: डॉ. बाबासाहेब देशमुख व मा.आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांची तालुका विकास आघाडी चे उमेदवार संगिता मोटे यांनी आपल्या प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. त्यांनी या निवडणुकीत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांना विकासासाठी पाठिंबा
या घेरडी व विविध गावांमध्ये कोपरा सभा आणि घरोघरी जाऊन भेटीगाठींवर भर देत आहेत. त्यांनी प्रामुख्याने रस्ते, पाणी आणि स्थानिक पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर भर दिला असून, नारळ या चिन्हावर मतदान करण्याचे आ-वाहन केले आहे. तालुका विकास आघाडी स्थानिक कार्यकर्त्यांनी या भागात मोठी फळी निर्माण केली असून, आघाडीच्या पाठिंब्यामुळे त्यांची बाजू वरचढ दिसत आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात, त्यांनी युवकांना आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपल्या प्रचाराची रणनीती आखली आहे.



