घेरडी जिल्हा परिषद गटातून ,शुभांगी मोटे व श्रीनिवास करे यांना घेरडी भागातील मतदारांचा प्रचंड पाठिंबा

सांगोला /विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
घेरडी जिल्हा परिषद गटात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून,घेरडी व आसपासच्या गावात राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीत सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये विशेष स्थान मिळवलेले, निष्कलंक आणि निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे माजी.सभापती अनिल मोटे यांच्या पत्नी सौ.शुभांगी मोटे व श्रीनिवास करे यांच्या उमेदवारीसाठी जनतेतून मोठा जनाधार निर्माण झाला आहे.
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत अनिल मोटे यांनी निवडणूक लढवली होती, त्यावेळी त्यांनी बाजी मारत, घेरडी भागात विकास कामांना गती मिळाली , म्हणून आपली सामाजिक जबाबदारी ओळखत सातत्याने जनतेच्या हिताचे काम सुरू ठेवले.केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नव्हे,तर निस्वार्थ वृत्तीने त्यांनी घेरडीत अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.मोटे व करे यांच्या प्रयत्नांमुळे घेरडीतील अनेक कुटुंबे आज स्वाभिमानाने जीवन जगत आहेत.त्यांनी कधीही राजकीय गट-तट किंवा पक्षीय राजकारण न करता सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींवर काम केले आहे.त्यामुळेच घेरडीत तरुण मतदारांमध्ये त्यांच्या विषयी विशेष आस्था निर्माण झाली आहे.आज शुभांगी मोटे घेरडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली तरी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार,महिला व तरुणांनी केला आहे.

कार्यकर्त्यांनी या वेळेस कोणतीही चूक न होऊ देता शुभांगी मोटे व श्रीनिवास करे यांना विजयी करण्यासाठी एकजुटीने काम सुरू केले आहे.राजकारणात स्वच्छ प्रतिमा,सातत्याने जनतेसाठी कार्य आणि रोजगारनिर्मितीचा ध्यास असलेल्या शुभांगी मोटे यांच्यासारखी व्यक्ती परिषदेमध्ये पोहोचली पाहिजे,अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शुभांगी मोटे, श्रीनीवास करे यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण घेरडी व आसपासच्या गावातील नागरीकामधूंन लक्ष लागले आहे.



