घेरडी ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार? अनेक कामाच्या ठिकाणी अडथळा..
दिलीप मोटे माजी .सरपंच घेरडी

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
घेरडी जिल्हा परिषद गटात जणतेच्या निष्ठावंतला डावलून, बाहेरच्यांना उमेदवारी दिली जाते,परंतू जणतेने आम्हाला डावललं नाही, आम्ही कोणाला विरोध नाही जणतेच्या आग्रह उत्सव ही उमेदवारी आपल्या पक्षाकडून घेतली तुम्ही दिली म्हणून,तुमचे आभार मानतो असे म्हणत ,घेरडी येथे उत्तम जानकर यांच्या जाहीर सभेत आपले मनोगत व्यक्त घेरडी गावचे माजी सरपंच दिलीप मोटे यांनी केले.त्यानंतर दिलीप मोटे पुढे म्हणाले.येत्या पाच तारखेला ज्या नेते मंडळांनी सांगितले गुलाल आमचाच आहे,तो गुलाल आम्ही दाखवून देऊ ,गुलाल आमचाच आहे, तो गुलाला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत, जानकर साहेब गेल्या अनेक वर्षांपासून ,या घेरडी ग्रामपंचायत मध्ये अनेक जणांची सत्ता आली , आम्हाला काल सांगितल गेलं आम्ही निष्ठींन काम करतोय परंतु कोरोनाच्या काळात या घेरडी गावचे सरपंच बिरा भाऊ पुकळे होते.त्यांनी किती पध्दतीने काम केले,आणि काय केलं हे सर्व जणतेला माहीत आहे.कुणी स्टेजवर येऊन सांगून या जणतेची दिशा भुल करु शकत नाही.गेल्या पाच वर्षाच्या कारभार घेरडी ग्रामपंचायत चा बघीतला अनेक कामाच्या ठिकाणी अडथळा करण्याचे काम केले आहे.विकास करायचा असेल तर, विकासाला चालना द्यायची असेल,आलेल्या विकासाची कामे केली पाहिजे, काम न करता टेंडर आपल्याला कसं मिळतंय या कडे बघण्याचा दृष्टीकोन ठेवला, काम अडथळेत ठेवली,जल जिवनच काम चार वर्षांपासून अडकले आहे.जल जिवनच काम शासनान दिल,शासन आपल्याला काम देत असताना या ग्रामपंचायतीने बक्षीस पत्र न दिल्याने ,चार वर्षे काम बंद आहे. दलित वस्ती मध्ये लाईट बंद आहे , चार वर्षे झाले बिल निघाले आहे, ग्रामपंचायतीने अनेक मोठा भ्रष्टाचार केला,गरीब ग्रामसेवकाला घरी घालवलं, निलंबित केले.विभागीय आयुक्त. पुणे यांनी त्या कामाची चौकशी केली, आम्ही कुठला अर्ज देऊन चौकशी झाली नाही, असे पुढे म्हणाले. व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ,व तुतारी चिन्हाचे उमेदवार शुभांगी मोटे, श्रीनिवास करे यांना भरघोस मताने विजयी करा असे म्हणून आलेल्या सर्व मतदारांचे व उत्तम जानकर यांचे आभार मानले.



