आपला जिल्हा

सांगोला तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा उडणार धुरळा,

फेब्रुवारी अखेर 62 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाकडून नियोजन सुरू : उमेशचंद्र कुलकर्णी

सांगोला /विशेष प्रतिनिधी :

विकास गंगणे
मो.9881583935

नगरपालिका पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता सांगोला तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. तत्पूर्वी या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी व कृषी अधिकारी यांच्याकडे प्रशासक म्हणून कार्यभार सोपवला जाणार असून त्या अनुषंगाने फेब्रुवारी अखेरपर्यंत 62 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाकडून नियोजन सुरू करण्यात आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे.
2 डिसेंबर रोजी सांगोला नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर 21 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्या पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामधून अद्याप उमेदवारांच्या व कार्यकर्त्यांच्या अंगावरचा गुलाल निघाला नाही. तोपर्यंतच उद्याच्या 26 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील 62 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मुदती संपणार आहेत. तसेच यापूर्वी 5 ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या आहेत. त्यापूर्वीच म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंत आयोगाकडून निवडणुकी संदर्भात सूचना प्राप्त झाल्या नाही तर पंचायत समिती प्रशासनाकडून प्रशासक नेमणूक करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. दरम्यान सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सांगोला तालुक्यातील सोनलवाडी, बागलवाडी, राजापूर, सोनंद, गळवेवाडी अशा एकूण 5 ग्रामपंचायतीवर यापूर्वीपासूनच प्रशासक यांची नेमणूक केली आहे. त्यानंतर येत्या 14 दिवसात म्हणजेच फेब्रुवारी 2026 मध्ये तालुक्यातील 67 ग्रामपंचायतच्या मुदती संपणार आहेत. एकंदरीत 67 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यासाठी कोणत्या एक क्षणी आयोगाकडून सूचना येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी गावच्या विकासाला खोडा बसू नये नागरिकांची कामे प्रलंबित राहू नये यासाठी ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व कृषी अधिकारी यांच्याकडे वेगवेगळ्या ग्रामपंचायतचा पदभार दिला जाणार आहे. याकरता पंचायत समिती स्तरावरून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आले असल्याचेही गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
नगरपालिका त्या पाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका नंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आता गाव पुढाऱ्यांना देखील पुढे यावे लागणार आहे. यासाठी आयोगाकडून लवकरच आचारसंहिता जाहीर होईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चौकट
सांगोला तालुक्यातील 5 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. उर्वरित 62 ग्रामपंचायतची फेब्रुवारी 2026 मध्ये मुदत संपणार आहे. फेब्रुवारी मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची मुदत संपण्यापूर्वी नवीन बॉडी करणे गरजेचे आहे. आयोगाकडून निवडणुकीबाबत कोणतीही सूचना न आल्यास 62 ग्रामपंचायत वर प्रशासक नेमण्याची नियोजन वरिष्ठांच्या आदेशानुसार होईल.
मा. वसंत फुले – साह्य. गटविकास अधिकारी सांगोला पंचायत समिती

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??