ताज्या घडामोडी

हॉटेल व्यावसायिकांकडून नियम धाब्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज, ग्रामस्थांची मागणी 

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सांगोला व हायवेवरील ग्रामीण भागातील 

सध्या अनेक हॉटेल, बेकरी, दुकानदार, खाद्यपदार्थ उत्पादक आणि दूध विक्रेते यांच्याकडून नियम धाब्यावर बसवत मनमानी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांकडे अन्न व औषध विभागाचा परवाना देखील नसून खाद्य बनवण्यासाठी घरगुती सिलिंडरचा वापर होत आहे, तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या मालाची विक्री सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याचा धोका आहे.

 

हैवेच्या परिसरात विविध खाद्यपदार्थ तयार करणारे, दुकाने, हॉटेल यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने तपासणीची मोहीम सुरू करणे गरजेचे आहे.

 

खाद्यपदार्थ उत्पादक कारखाने, तेल निर्मिती कारखाने, हॉटेल, बेकरी यांच्यावर तपास करण्याची गरज आहे.

 

परंतु कोणत्याही प्रकारची तपासणीच नसल्याने बेकरी, हॉटेल, दुकानचालक, विविध खाद्यपदार्थ उत्पादकही बिनधास्त झाले आहेत. अनेक बेकरींमध्ये विक्री होत असलेल्या उत्पादनांवर उत्पादन, एक्स्पायरीची तारीख नाही. त्यांना विचारले तर उडवाउडवीची उत्तरे देतात.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??