ताज्या घडामोडी

सांगोल्यात व ग्रामीण भागात विनापरवाना विषारी हातभट्टी दारू,ताडी विक्री सुरूच…

ग्रामीण भागात कारवाई कधी?  भाग.नं.३ उद्या पहा..

सांगोला विशेष प्रतिनिधी 

/विकास गंगणे 

मो.9881583935

 

सांगोला शहरासह ग्रामीण

भागातील गावोगावी विषारी हातभट्टी दारू विक्री सुरू आहे. त्याचबरोबर शिंदी विक्री व विना परवाना देशी विदेशी दारू विक्रीही जोमात चालू आहे. या विषारी हातभट्टी दारूमुळे अनेकजण मरण पावले आहेत. तर अनेकजण मरणाच्या दारावर आहेत. अनेकांचे दारूमुळे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या अवैध दारू विक्रेत्यांवर किरकोळ कारवाई केली जाते, तर या पकडलेल्या किती दारू विक्रेत्यांवर कोणत्या विभागात गुन्हे दाखल होतात. हा संशोधनाचा विषय आहे.

 

अनेकवेळा महिन्यातून एकदा राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी खासगी गाडी घेऊन येतात. दारू विक्री करणाऱ्यांना पकडतात. त्यांच्याकडून हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम घेऊन त्यांना त्याच ठिकाणी

 

सोडून देतात. ही अवैध हातभट्टी दारू व विना परवाना देशी-विदेशी दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभाग यांच्या आशीर्वादाने जोमात सुरू आहे. याचा त्रास महिला, सर्वसामान्य नागरिक यांना होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीयनि लक्ष देण्याची मागणी होत आहे.

 

सांगोला शहरासह ग्रामीण भागातील गल्ली-बोळात व्यावसायिकांनी हातभट्टी व देशी-विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. या विक्रेत्यांना हातभट्टी दारू पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील अनेक भागात पावडरपासून शिंदी बनवलेली तसेच हातभट्टीचे केंद्रही सुरू केले आहेत. ही हातभट्टी दारू युरिया काही रासायनिक व केमिकल वापरून तयार केलेली असते. त्यातच खराब गूळ, इतर रासायनिक केमिकल यामुळे या दारूचा

 

उग्र वास येत असतो. तसेच ही दारू कसल्याही भांड्यात, बाटल्यात, डब्यात व ट्यूबमध्ये भरली जाते. यामुळे ही दारू विषारी झाली आहे. ही हातभट्टी दारू ओढ्याला, डोंगरदऱ्या, झाडी यामध्ये राजरोसपणे उत्पादन केली जाते. याकडे कोणाचेही लक्ष नाही.

 

तालुक्यामध्ये गावोगावी एक ते पाच ठिकाणी गल्ली बोळात अवैध देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने

 

थाटली आहेत. या दुकानदारांना राजरोसपणे दिवसा व रात्री चारचाकी, दुचाकी गाडीवरून देशी व विदेशी दारूचे बॉक्स पोच केले जातात. हा व्यवसाय सध्या राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या धुमधडाक्यात चालू आहे. या अवैध व्यवसायामुळे सर्वसामान्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर अनेक लोक मरणही पावले आहेत. याला आशीर्वाद

 

महिला आक्रमक

 

दारू विक्री करणाऱ्या लोकांवर सध्या कोणताही राज्य उत्पादन शुल्क विभाग ठोस कारवाई करत नाही. कारण सांगोला राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभाग पोलिसांचे मलईवर लक्ष आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांवरती ठोस कारवाई केली जात नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगोला तालुक्यातील गावातील अवैध धंद्यांकडे लक्ष द्यावे, कारवाई करावी, असे आक्रमक होत महिलावर्गातून मागणी केली जात आहे.

 

शिंदी व हातभट्टीची विक्री

 

सांगोला तालुक्यात शिंदी व हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते. या विषारी दारूमुळे अनेकजण मरण पावले आहेत. तर अनेकजण आजारी पडले आहेत. या अवैध दारू विक्रेत्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करावी.

 

कोणाचा हा संशोधनाचा विषय आहे. जादा दराने दारुची विक्री होत आहे. तर विदेशी दारूही बनावट असल्याची चर्चा आहे. शिंदीची बाटली ३० रुपयाला तर हातभट्टी दारूची बाटली केवळ २०

रुपयाला मिळते. ही दारू स्वस्त मिळत असल्याने तलफ भागविण्यासाठी सर्वसामान्य दारू पिणाऱ्यांनाही परवडते. पण ही हातभट्टी दारू विषारी आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??