ताज्या घडामोडी

मायाक्कादेवी अर्बन महिला को-ऑप क्रेडिट सोसायटी सांगोला शाखेकडून सभासदांना दिवाळी निमित्त किराणा किटचे वाटप

सभासदांशी विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न - मायाक्कादेवी परिवार : विश्वासाची साथ, प्रगतीची वाट!

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

 

सांगोला : दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त मायाक्कादेवी अर्बन महिला को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., सांगोला शाखेच्या वतीने सभासदांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. सभासदांशी जपलेले विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

 

यावेळी संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या कार्यक्रम प्रसंगी दै. सांगोला वृत्तवेध चे संपादक सचिन भुसे व घेरडीचे माजी उपसरपंच फारुख आतार यांनी संस्थेच्या कार्याबद्दल शुभेच्छा पर मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आम्ही कायम तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.

 

सचिन भुसे म्हणाले, “मायाक्कादेवी सोसायटीने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”

 

फारुख आतार म्हणाले, “ही संस्था नेहमीच सभासदांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. यापुढेही संस्थेला आमचा नेहमीच पाठिंबा राहील.”

 

संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास करे यांनी संस्थेची माहिती देताना सांगितले की, संस्थेकडून ठेवी, पिग्मी, कर्ज सुविधा अशा अनेक प्रकारच्या सेवा दिल्या जातात. अगदी छोट्या ग्राहकापासून ते मोठ्या ग्राहकापर्यंत सर्वांसाठी सेवा उपलब्ध केली आहे. सभासदांच्या गरजा ओळखून त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

 

कार्यक्रमास संस्थेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार व विविध व्यावसायिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शशिकांत कोळी सर यांनी मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??