ताज्या घडामोडी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिपायांकडून अधिकार नसताना अवैध धंद्यांवर धाडीचा आरोप; महिला नागरिक उपोषणाच्या तयारीत

सांगोला विशेष प्रतिनिधी

विकास गंगणे 

मो9881583935

 

 

 सांगोला (दि. ६) – सांगोला तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिपायांकडून अधिकार नसताना अवैधरित्या हॉटेल व दारू विक्रीच्या ठिकाणी धाडी टाकून दमदाटी व पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ महिला नागरिक उपोषण करण्याच्या तयारीत आहेत.

 

सांगोला तालुक्यातील *अनकढाळ व नाझरे* या गावात एका हॉटेलमध्ये बेकायदेशीर दारू विक्री सुरु असल्याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका पोलीस शिपायाने तेथे जाऊन दारू पिऊन धिंगाणा घातल्याची व अधिकार नसताना त्या विक्रेत्यांना केसेस करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

 

दरम्यान, दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार दि. ०४/०९/२०२६ रोजी अनकढाळ ता. सांगोला .

 

अधिकृत कारवाईचा तपशील :-

एकूण गुन्हे – ०१, वारस – ०१, आरोपी – ०१, हातभट्टी दारू – ०.० लि., देशी दारू – ५.७६ बल्क लिटर, ताडी – ०.० लि., विदेशी दारू – ००, जप्त वाहन – ००, एकूण मुद्देमाल किंमत – २६१०/- रुपये. ही कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभाग व दुय्यम निरीक्षक पंढरपूर-२ सांगोला विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

मात्र प्रत्यक्षात शिपाई पातळीवरील कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या बेकायदेशीर वसुली व दमदाटीमुळे सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित शिपायावर कारवाई करावी, अशी लेखी स्वरूपात मागणी ग्रामस्थांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार असून, न्याय न मिळाल्यास महिला उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??