ताज्या घडामोडी

कमलापूर गावचे प्रा.डॉ.एन.डी बंडगर यांचा आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सन्मान

[ नुकतीच शिवाजी विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पीएचडी पदवी मिळवली]

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

 कमलापूर गावचे सुपुत्र,शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे कोअर कमिटीचे सोशल मीडिया सदस्य व लोकप्रिय आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांचे विश्वासू सहकारी प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर व उत्साही असणारे प्रा. डॉ.एन.डी बंडगर यांनी शिवाजी विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात नुकतीच शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पीएचडी मिळवली.

प्राध्यापक बंडगर हे नेहमीच लोकांच्या मध्ये मिसळणारे तसेच शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक,धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान नेहमीच महत्वाचे राहिलेले आहे. त्यांनी पीएचडी मिळवल्यबद्दल त्यांचा सन्मान लोकप्रिय आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी प्रा.डॉ.बंडगर यांचे कौतुक केले.

 कमलापूर गावासाठी आणि सांगोला तालुक्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आसल्याचे आमदारसाहेबांनी बोलताना सांगीतले.

प्रा.एन.डी बंडगर यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत पीएचडी मिळवुन मिळवलेले यश शास्वत आहे.अर्थशास्त्र सारख्या विषयात पीएचडी मिळवणे तेही आपल्याच भागातील माण नदी खोऱ्यातील दुष्काळी धोरण,नियोजन आणि नियंत्रण हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय निवडला.या संशोधनाचा फायदा कित्येक वर्षे समाजासाठी फायद्याचा ठरनार असल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सागीतले.यावेळी कमलापूर गावचे युवा नेते बाबुराव बंडगर, तालुका दूध संघाचे मारुती लवटे महूद गावचे दिगंबर 

 येडगे, सुखदेव बंडगर,चेअरमन दिलीप बंडगर, भोजलिंग बंडगर, एस ऑडिओ चे बबलू शेठ बंडगर, दत्तात्रय बंडगर,सुरेश बंडगर, मानाजी बंडगर, धनगर समाज सेवा मंडळाचे नवनाथ शिंगाडे, भगवान पांढरे,मेजर समाधान बंडगर, सुखदेव गडदे, इत्यादी असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित असल्याची माहीती भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??