ताज्या घडामोडी

महामार्ग पोलिसांच्या तत्पर सेवेमुळे वाहनचालकांना दिलासा

कवठेमहांकाळ महामार्ग मदत केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक!

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

 : राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासोबतच अपघातप्रसंगी मदत, वाहतूक नियंत्रण आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी महामार्ग पोलिस मदत केंद्र, कवठेमहांकाळ येथील अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण नावले तसेच सुनील शिरसाठ आणि महामार्ग वाहतूक पोलिस कर्मचारी यांच्याकडून महामार्गावरील परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या वेळी मदत केली जात असल्याचे दिसून येते.

 

महामार्गावर वाढती वाहनांची वर्दळ लक्षात घेता वाहतूक शिस्त राखणे आणि अपघाताचा धोका कमी करण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरते. अपघात किंवा वाहतुकीची अडचण निर्माण झाल्यास घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे कामही महामार्ग पोलिसांकडून केले जाते.

 

विशेषतः राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा वेळी पोलिसांची गस्त, वाहतूक नियंत्रण आणि वाहनचालकांना आवश्यक मार्गदर्शन यामुळे प्रवाशांना मदत मिळते. महामार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या या कामाचे वाहनचालक आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.

महामार्गावरील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध राहण्यासाठी पोलिसांचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे असून, कवठेमहांकाळ महामार्ग मदत केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेणे आवश्यक आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??