ताज्या घडामोडी

पारे गावच्या विकासासाठी माजी. सरपंच संतोष पाटील आघाडीवर

गावातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा; विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न.

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

  गावाचा विकास हा केवळ आश्वासनांनी नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून दिसून येतो. पारे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष पाटील हे गावाच्या विकासासाठी तरुण पिढी व वयोवृद्धांचा सल्ला घेऊन एक पाऊल पुढे राहून, विविध विकासकामांचा पाठपुरावा करीत असल्याचे चित्र आहे. ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

 

गावातील रस्ते, स्वच्छता, पाणी, सार्वजनिक सुविधा आणि इतर मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देत उपलब्ध शासकीय योजना व निधीच्या माध्यमातून कामे मार्गी लावण्यावर भर दिला जात आहे. एखादे काम मंजूर झाल्यानंतर ते प्रत्यक्षात पूर्ण होईपर्यंत संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करणे, ही विकासकामांची महत्त्वाची बाजू असून त्यासाठी सरपंच पाटील प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

 

‘गावाचा विकास थांबता कामा नये’ या भूमिकेतून प्रलंबित प्रश्नांना चालना देण्याचा प्रयत्न होत असून, ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रमांना गती देण्याचे काम सुरू आहे.

 

पारे सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांचा सहभाग आणि ग्रामपंचायतीचे प्रभावी नियोजन यांची सांगड घालण्याची गरज आहे. त्यादृष्टीने माजी सरपंच संतोष पाटील यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरत असून, विकासकामांसाठी ‘एक पाऊल पुढे’ राहण्याची त्यांची भूमिका ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

 

आगामी काळात गावातील प्रलंबित कामे मार्गी लागून विकासकामांना आणखी वेग मिळावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??