ताज्या घडामोडी

घरपट्टी-पाणीपट्टी वेळेवर भरा; शासकीय कामेही मुदतीत पूर्ण करा

ग्रामसेवक सुनील साळुंखे यांचे डिकसळ ग्रामस्थांना आवाहन.

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

 डिकसळ ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांना गती मिळण्यासाठी तसेच ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी ग्रामसेवक सुनील साळुंखे यांनी ग्रामस्थांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. नागरिकांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी वेळेवर भरावी, तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित आवश्यक शासकीय कामे आणि कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी, असे त्यांनी सांगितले.

 

ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातून गावातील विविध नागरी सुविधा, देखभाल-दुरुस्तीची कामे आणि ग्रामपंचायतीच्या दैनंदिन प्रशासकीय कामांना हातभार लागतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली थकबाकी न ठेवता कर वेळेत भरणे आवश्यक असल्याचे ग्रामसेवक साळुंखे यांनी स्पष्ट केले.

 

तसेच जन्म-मृत्यू दाखले, विविध प्रमाणपत्रे, ग्रामपंचायत नोंदी, शासकीय योजनांशी संबंधित कागदपत्रे अथवा इतर आवश्यक कामांसाठी नागरिकांनी कार्यालयीन प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देताना नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास कामे अधिक जलद आणि सुरळीतपणे पूर्ण करण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

गावाच्या विकासासाठी केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून ग्रामस्थांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. नागरिकांनी वेळेवर कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे आणि शासकीय कामांसाठी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामसेवक सुनील साळुंखे यांनी केले.

 

डिकसळ गावातील नागरिकांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन घरपट्टी व पाणीपट्टी नियमितपणे भरावी आणि ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांना सहकार्य करावे, असा संदेश ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??