पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वनव्यवस्थापन समिती चे अध्यक्ष -दत्तात्रय करांडे यांचा ग्रामस्थांना शुभेच्छा संदेश

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.९८८१५८३९३५
डिकसळ (ता. सांगोला) येथील वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय करांडे यांनी दीपावली सणानिमित्त गावातील सर्व ग्रामस्थांना, महिला-भगिनींना, ज्येष्ठ नागरिकांना, युवकांना तसेच शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
दीपावली हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि मांगल्याचा सण आहे. प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधानाचा प्रकाश पसरावा, शेतकरी बांधवांच्या जीवनात आनंदाचे दिवस यावेत, तसेच गावात एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, अशी सदिच्छा दत्तात्रय करांडे यांनी व्यक्त केली.
गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे आणि निसर्ग व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेऊन आनंदाची दीपावली साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
डिकसळ गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरात सुख-समृद्धी नांदो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलो आणि येणारे वर्ष सर्वांसाठी भरभराटीचे जावो, अशा शुभेच्छा वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय करांडे यांनी दिल्या आहेत.



