ताज्या घडामोडी

डिकसळकरांच्या एकजुटीचा आवाज बुलंद! म्हैसाळच्या पाण्यासाठी धरणे आंदोलन; अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

सांगोला /विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील शेतकऱ्यांना म्हैसाळ योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी एकजुटीने पुढाकार घेत जत तालुक्यातील वायफळ कॅनॉल वरती धरणे आंदोलन केले. जत तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पाणी अडवले जात असल्याने डिकसळच्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणा, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख आजी-माजी आमदार शहाजी बापू पाटील, दिपक आबा साळुंखे पाटील पंचायत समिती,जि.प.सदस्य पोलीस स्टेशन धरणे आंदोलन करण्यात येणार आहे म्हणून, शेतकऱ्यांचा सह्यांनी परवानगी मागीतली.

त्यानंतर आज 

डिकसळच्या शेतकऱ्यांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे पाणीप्रश्न ऐरणीवर आला. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत म्हैसाळ योजनेचे संबंधित अधिकारी एस.बी पवार सहायक अभियंता,ए.व्ही. येड्रावकर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आंदोलनस्थळी उपस्थित झाले. शेतकऱ्यांना पाणी ११ तारखेला देण्याबाबत अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

मात्र, केवळ आश्वासनावर न थांबता प्रत्यक्षात पाणी कधी मिळणार, पाणीपुरवठ्याचे नियोजन कसे असणार आणि डिकसळच्या शेतकऱ्यांना नियमितपणे पाणी मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी वेळेत होणे गरजेचे असून, शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

डिकसळच्या शेतकऱ्यांनी एकजुटीने उभे राहून आपल्या हक्काच्या पाण्यासाठी दिलेला लढा हा गावातील एकीचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे. आता संबंधित विभाग प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??