ताज्या घडामोडी

जतमध्ये स्टॅम्पची चढ्या दराने विक्री? ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम आकारल्याच्या तक्रारी

प्रतिनिधी विजय तिकोटी 9130460323

जत शहरात स्टॅम्प खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून स्टॅम्पच्या दर्शनी किमतीपेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे स्टॅम्प विक्री व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रशासनाने याची तातडीने चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्टॅम्पची दर्शनी किंमत निश्चित असताना त्यापेक्षा जादा रक्कम आकारली जात असल्यास हा प्रकार गंभीर आहे. विशेषतः शासकीय कामांसाठी स्टॅम्प घेणाऱ्या सामान्य नागरिकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची चर्चा आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी जत शहरातील स्टॅम्प विक्रेत्यांची तपासणी करून परवाना, अधिकृत दर, स्टॉक रजिस्टर, विक्री नोंदी आणि ग्राहकांकडून आकारण्यात येणारी रक्कम यांची पडताळणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्टॅम्प विक्रीतील दराबाबत स्पष्टता निर्माण करण्यासाठी प्रशासनाने अधिकृत दरफलक लावण्याची तसेच नागरिकांना पावती देण्याची व्यवस्था काटेकोरपणे लागू करावी, अशीही मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??