ताज्या घडामोडी

हिंगणगाव येथे २३ ऑक्टोबर रोजी संत बाळूमामांचा जन्मोत्सव सोहळा; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सांगोला विशेष प्रतिनिधी

विकास गंगणे

 

धनगर ओव्यांचा भव्य कार्यक्रम, भजन, नामकरण सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन,

 

हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ : हिंगणगाव येथील श्री सद्गुरू संत बाळूमामा देवालयात संत बाळूमामांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात काकड आरती, भव्य धनगरी ओव्यांचा कार्यक्रम, भजन, संत बाळूमामांचा नामकरण सोहळा आणि महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. या धार्मिक सोहळ्यास परिसरातील तसेच विविध गावांतील बाळूमामा भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमाला गुरुवर्य पुजारी गुजर मामा तसेच हिंदकेसरी शाहीर संजय पडळकर (मानखुर्द, मुंबई) यांची उपस्थिती असणार आहे. तसेच जय अहिल्या संत बाळूमामा ओविकार मंडळ, सलगरे (मानखुर्द, मुंबई) यांच्या वतीने धनगरी ओव्यांचा भव्य कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

 

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

 

सकाळी ७ वाजता : काकड आरती.

सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत : हिंदकेसरी शाहीर संजय पडळकर यांच्या उपस्थितीत जय अहिल्या संत बाळूमामा ओविकार मंडळाचा भव्य धनगरी ओव्यांचा कार्यक्रम.

दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत : भजनाचा कार्यक्रम.

सायंकाळी ४.२३ वाजता : श्री सद्गुरू संत बाळूमामांचा नामकरण सोहळा.

सायंकाळी ४.३० वाजल्यापासून : महाप्रसादास सुरुवात.

 

संत बाळूमामांच्या भक्तीचा जागर, धनगरी संस्कृतीचा वारसा आणि आध्यात्मिक वातावरणाने हा जन्मोत्सव सोहळा भक्तिमय होणार आहे. या निमित्ताने भाविकांना धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.

 

तरी हिंगणगाव व परिसरातील सर्व बाळूमामा भक्तांनी या जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??