ताज्या घडामोडी

दिवाळीच्या खरेदीसाठी सांगोल्यात गर्दीचा महापूर; मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडीने नागरिक हैराण!

सांगोला विशेष प्रतिनिधी

मो.9881583935

 

 

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सांगोला शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. नवीन कपडे, किराणा साहित्य, फराळाचे साहित्य, सजावटीच्या वस्तू तसेच दिवाळीच्या विविध खरेदीसाठी सांगोला शहरासह ग्रामीण भागातील नागरिक बाजारपेठेत दाखल होत आहेत. मात्र, या वाढत्या गर्दीबरोबरच मुख्य चौक आणि बाजारपेठेतील रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत आहे.

मुख्य बाजारपेठेत दुचाकी, चारचाकी वाहने तसेच इतर वाहनांची वर्दळ वाढली असून अनेक ठिकाणी वाहने एकाच वेळी रस्त्यावर आल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना रस्ता ओलांडताना आणि बाजारपेठेतून मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

विशेष म्हणजे सणासुदीच्या काळात बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होणार हे प्रशासनाला माहीत असतानाही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुरेसे नियोजन केले जात आहे का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. मुख्य चौकात वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची प्रभावी उपस्थिती आणि योग्य नियोजन असणे आवश्यक असताना वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या महिलांना वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढताना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेत वाहनांची अनियंत्रित वर्दळ, रस्त्याच्या कडेला होणारी वाहनांची गर्दी आणि पादचाऱ्यांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.

 

त्यामुळे सांगोला पोलिस प्रशासनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्य बाजारपेठ, प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी. आवश्यक त्या ठिकाणी वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करावेत, नो-पार्किंग

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??