सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जवळा याबद्दल कोणाची तक्रार असेल तर , अर्ज करा: आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जवळा ,येथील बँक मॅनेजर च्या कृपाशीर्वादाने बँकेत आल्यापासून त्यांच्या मनमानी कारभारामुळे ,बँकेतील कर्मचारी अनेक खातेदारांना पासबुक वरती एंट्री मारण्यासाठी,चालढकल करत असल्याचे व त्या खातेदारांना बँकेत इतर कामासाठी आरिव्हची भाषा या बँक मॅनेजर कडून होत आहे, गेल्या आठ नऊ महिन्याच्या पाठीमागे याच बँक मॅनेजर बद्दल जवळा गावातील एका खातेदाराने माजी. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्याकडे या मुजोर बँक मॅनेजरची तक्रार सांगितली होती .त्याचवेळी दीपक आबा साळुंखे पाटील त्या बँक मॅनेजरची कान उघडणे केली होती . त्यानंतर काही दिवस कामकाज सुरळीत होते.परंतु हा बँक मॅनेजर कोणालाही जुमानत देखील नाही. काही खातेदार या बँकेत कामानिमित्त गेले असता हा बँक मॅनेजर स्वतःच्या केबिनमध्ये बसून काही खातेदारांना चुकीची माहिती देतो, व काही खातेदारांना उडवाउडवीची उत्तरे देतो.अशी परिस्थिती असताना , या बँकेत काही खातेदार पासबुक वरती एन्ट्री मारण्यास आली असताना मशीन बंद आहे. म्हणून या मुजोर साहेबांनी व इतर कर्मचाऱ्यांनी कांगावाच केला.तर काही खातेदार खात्यावरील पैसे काढण्यासाठी गेले असता बँकेत कॅश नाही अशी उडवडीची उत्तरे ही ऐकावयास मिळतात .या बँकेच्या मनमानी कारभार बद्दल ,बातमी येताच सांगोल्याचे लोकप्रिय आमदार :डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी काही खातीदारांशी विचारपूस करून वेळीच दखल घेऊन, सेंटर बँक ऑफ इंडिया शाखा जवळा याबद्दल कोणाची तक्रार असेल तर किंवा हा बँक मॅनेजर कर्ज वसुलीसाठी तगादा लावत असेल तर , किंवा इतर कामासाठी काही अडचण आल्यास माझ्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार अर्ज द्या. असेही पत्रकाराशी बोलताना सांगितले.

हा बँक मॅनेजर खातेदारांना वयोवृद्धांना चुकीची माहिती देऊन, विनाकारण हेलपाटे, व दिवसभर या खातेदारांना ताटकळत बसावं लागत आहे. जेवण करायचे आहे म्हणून, कर्मचारी खातेदारांना दोन ते तीन तास थांबावे लागत आहे. अशी या बँक मॅनेजरची उचल बांगडी लवकरच करावी,त्या ठिकाणी काम करण्यासाठी होतकरू बँक मॅनेजर द्यावा अशी चर्चा जवळा व आसपासच्या गावांमधून होत आहे.



