बेकायदेशीर दारू ताडी वर कारवाई की, ‘अर्थपूर्ण वाटाघाटी’चा खेळ ?
बेकायदेशीर दारू ताडी पकडली जात असूनही ठोस कारवाईचा अभाव; राज्य उत्पादन शुल्क विभाग भूमिकेवर संशय

सांगोला| विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यासह परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू ताडी अवैध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जात असल्याचे दाखविले जात असले, तरी प्रत्यक्षात कारवाईच्या नावाखाली पकडण्यात आलेली काही बेकायदेशीर दारू ताडी विक्री पुन्हा प्रत्येक गावात रस्त्यावर व चौका चौकात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, कडलास जवळा, मेडशिंगी घेरडी या येणाऱ्या अंतर्गत गावात बेकायदेशीर दारू ताडी विक्री अवैध करताना आढळून येत असूनही, त्यांच्यावर ठोस व कायदेशीर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरीकामधूंनउपस्थित होत आहे.
‘अर्थपूर्ण वाटाघाटी’ च्या आरोपांची चौकशी कोण करणार? राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून
या अगोदर घेरडी अंतर्गत येणाऱ्या एका गावात अवैधरित्या दारू विक्रेता सापडला होता,
पकडलेल्या दारू विक्रेत्यावरती अपेक्षित कायदेशीर कारवाई न करता ‘अर्थपूर्ण वाटाघाटी’ करून सोडून दिले जात असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून त्यामध्ये तत्य आहे किंवा नाही, याची निष्क्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे.
कारवाई करणान्या अधिकान्यांनी बेकायदेशीर दारू ताडी विक्रीतेवरती पकडलेल्या प्रत्येक छायाचित्रे, पंचनामा, दंडाची पावती, संबंधित प्रकरणाची नोंद सार्वजनिक तपासणीसाठी उपलब्ध करून घ्यावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
बेकायदेशीर दारू ताडी विक्री वाले पकडायचे, ताब्यात घ्यायचे आणि पुन्हा सोडायचे?
असे का? अशी सर्वसामान्य नागरीकामधूंन आरोप केला जात आहे.



