आपला जिल्हा

घेरडी गटातील मतदार, लाडक्या बहिणीला विजयी करतील. 

मा.अनिलभाऊ मोटे 

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

हो.9881583935

 

घेरडी गटात मी सभापती असताना माझ्या काळातील विकासाची बीजे रोवली आहेत. त्यांचा वसा जपण्यासाठी माझी पत्नी : शुभांगी अनिल मोटे या घेरडी गटातून जिल्हा परिषदेसाठी लढत आहेत. या लाडक्या बहिणीला येथील मतदार विजयी करतील, असा विश्वास त्यांचे पती: मा अनिल मोटे यांनी व्यक्त केला.

 विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेरडी गटातून शुभांगी मोटे , तर पंचायत समिती गट घेरडीतून श्रीनिवास करे गणातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना आपले मतरूपी आशीर्वादाची नितांत गरज आहे.

 

माजी सभापती अनिल मोटे म्हणाले, घेरडी जिल्हा परिषद गटाचा विकास ही संकल्पना घेऊन आम्ही तुतारीच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झालो. तुतारीच्या चिन्हावर मतदारांच्या समोर गेलो आहोत. जिल्हा परिषद गटात तुतारीच्या जोरावर सर्व उमेदवार विजयी होणार. उमेदवार सौ.शुभांगी अनिल मोटे व श्रीनिवास करे म्हणाले,

मतदारसंघातील मंदिर देवस्थान परिसरातील भाविक भक्तांना सोयी-सुविधा पुरविणे, यात्रेला स्वरूप देणे, खिलार जनावरांचे संवर्धन साधने, गावोगावी स्वच्छ मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन केल्याचे सांगितले. जनतेने आमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठेवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू.

शुभांगी मोटे म्हणाल्या, समृद्ध गावे, सुरक्षित भविष्य, पारदर्शक विकासाच्या अपेक्षा पूर्ण करत जनतेला व्यापक दृष्टीने बळकटी देण्यासाठी मी प्रामाणिक काम करणार आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून पद मिळवण्याचे माझे ध्येय नाही, लोकांना अपेक्षित असलेल्या गावांचा विकास हेच माझे अंतिम ध्येय आहे. त्यालाच कर्तव्य म्हणून मी काम करणार आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??