ताज्या घडामोडी

अन्न-औषध’ च्या पंचनाम्याची वेळ ‘अन्न,व औषध’ प्रशासन विभागाकडून कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ : कारवाईचा नेमका आकडा किती ? 

सांगोला/ विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकासल्यानंतर अन्नभेसळ, निकृष्ट खाद्यपदार्थ, बेकायदेशीर उत्पादन आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राज्यभर धडक मोहीम सुरू केली आहे. मोठमोठ्या हॉटेल्सपासून बेकय्रा, खाद्यपदार्थ उत्पादक, डेअऱ्या आणि विविध व्यावसायिक आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र मुंडेच्या या मोहिमेअंतर्गत सांगोल्यात अन्न, औषध विभागाने किती कारवाया केल्या याची अधिकृत आणि सविस्तर आकडेवारी मात्र अद्याप माध्यमांसमोर आलेली नाही. या विभागातील अधिकाऱ्यांकडून कारवाईची माहिती सांगण्यासाठी जाणीवपूर्वक बा

चालढकल केली जात आहे. त्यामुळे तोडपाणी करून कारवाई ‘मॅनेज’ केली जातेय का? असा सवाल जाणकार नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

 

सांगोला तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत सांगोला परिसरातील काही गावांमध्ये बनावट उत्पादन केंद्र, डेअरी, परिसरातील भेसळयुक्त प्रसाद, तसेच विविध हॉटेल्स, गुटखा विक्री पानटपरीवर कारवाई केली. परंतु ही कारवाई नेमकी किती मोठी आहे आणि जिल्ह्यातील एकूण अन्न व्यावसायाच्या तुलनेत या कारवायांचे प्रमाण किती आहे? हा खरा सवाल आहे. गेल्या काही दिवसात अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी धाडी ठाकून किराणा माल,

दुकान, बेकरीला अन्य खाद्यपदार्थ बन उद्योगांची तपासणी केली. पण या तपासणीमध्ये अधिकान्यांना कारवाईत काही सापडले का? को सापडल्यानंतरही सर्व काही मॅनेज केले? असा प्रश्न अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे निर्माण होत आहे.

 

  सांगोला तालुक्यात किती हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकऱ्या, स्वीटमार्ट, डेऱ्या, फरसाण दुकाने, खाद्यपदार्थ उत्पादक आणि खाद्यतेल विक्रेत्यांची तपासणी झाली? किती नमुने प्रयोगशालेत पाठविण्यात आले? त्यापैकी किती नमुने निकृष्ट किया भेसळयुक्त आढळले? किती आस्थापनांवर दंडात्मक कारवाई झाली? किती परवाने निलंबित अथया रद्द झाले? किती प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल झाले? आणि किती प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत? या प्रश्नांची उत्तरे अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाकडून आकडेवारीसह जनतेसमोर येणे अपेक्षित आहे. कारण अन्न व औषध प्रशासन हे केवळ छापे टाकणारे खाते नाही. तपासणी, नमुना संकलन, प्रयोगशाला अहवाल, दोष निश्चिती, परवाना कारवाई, गुन्हा दाखल करणे आणि अंतिम निकाल ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक आहे. पण सांगोल्यात मात्र केलेल्या कारवाईबाबत इतकी गोपनीयता का बाळगली जाते, त्यामध्ये काय गौडबंगाल आहे, याचा शोध आता खुद तुकाराम मुंढे यांनीय घेण्याची गरज आहे.

 

   विशेष कायदेशीर पथक स्थापन करण्यायी सूचनाही केली आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??