ताज्या घडामोडी

सालाबादप्रमाणे वर्ष ५ वे श्री .संत बाळूमामा मंदिर, हिंगणगाव येथे भंडारा उत्सवाचे आयोजन

सांगोला/विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.९८८१५८३९३५

 

    हिंगणगाव.ता.कवठेमहांकाळ , जि. सांगली : सालाबादप्रमाणे श्री संत बाळूमामा मंदिर, हिंगणगाव येथे यंदाही भव्य भंडारा उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

भंडारा उत्सवानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता श्रींची आरती, त्यानंतर सकाळी ९ वाजता ओवीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत वाटंबरे यांचा सुरसनईचा वकार्यक्रम, तर दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत संगितमय किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यानंतर सायंकाळी ६ वाजता गुरुवर्य बाळ महाराज गिरलिंगेश्वर यांच्या शुभहस्ते आरती करण्यात येणार आहे. तसेच रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत ह. भ. प. अर्चना दीदी सांखुळे-मुळशी यांचा संगितमय कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या भंडारा उस भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री संत बाळूमामांचे दर्शन घेऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ,हिंगणगावचे श्री संतमामाचे भक्त तथा पुजारी गुजर मामा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??