घेरडीच्या गटात संगिता ताई केवळ एक उमेदवार नाहीत, तर त्या घेरडी गटातील प्रत्येक अन्यायाविरुद्ध उठलेला आवाज
प्रस्थापितांच्या सत्तेला 'दे धक्का'!

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
घेरडी जिल्हा परिषद गटाच्या राजकीय इतिहासात आजवर अनेक सत्तांतरे झाली असतील, पण यंदाचे वारे काही वेगळेच सांगत आहेत. गेल्या काही दहा वर्षांपासून विकासाचा आव आणून सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसलेल्या प्रवृत्तींना उखडून टाकण्यासाठी घेरडीची जनता आता सज्ज झाली आहे. कोणत्याही राजकीय घराणेशाहीचा शिक्का कपाळावर नसताना, केवळ ‘जनसेवा’ हाच आपला वारसा मानणाऱ्या संगिताताई सोमा (आबा)मोटे यांनी नारळ ‘ चिन्हाच्या बळावर परिवर्तनाचे रणशिंग फुंकले आहे. *वारसा नाही, तर कष्टाचा ‘नारळ” सरसावला !
“सत्ता ही कोणाची खासगी जहागीर नसते,” हे ठणकावून सांगत संगिता ताईंनी घेरडीच्या मातीत नवा विचार पेरला आहे. घराणेशाहीच्या छायेत वाढणाऱ्या नेतृत्वापेक्षा, सामान्य जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारा हक्काचा ‘नारळ’ म्हणून आज संगिता ताई पाहिले जात आहे. महिलांना ‘चूल आणि मूल’ या पारंपरिक चौकटीतून बाहेर काढून, त्यांना सत्तेत समान वाटा आणि सन्मान मिळवून देण्याची जिद्द त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत आहे. अनेक वर्षांच्या सत्तेचा माज उतरवणार.
गेल्या १५ वर्षांपासून ज्यांनी विकासाच्या नावाखाली स्वविकासाची केंद्रे उभी केली, त्यांना आता सर्वसामान्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. जर ती सत्ता भोगूनही सामान्य माणसाला आजही परिवर्तनासाठी साकडे घालावे लागत असेल, तर सत्ताधाऱ्यांनी जनतेचा विश्वास पूर्णतः गमावला आहे, हे आता लपून राहिलेले नाही. या प्रस्थापित सत्तेच्या भिंती पाडण्यासाठी आता घेरडीच्या जनतेने, शेकाप पक्षाचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व मा.आमदार दिपक आबा साळुंके पाटील यांच्या युतीतून ‘अभय देणारा नारळ हातात घेण्याचे ठरवले
आहे.
सक्षम महिला नेतृत्वाची नवी पहाट
संगिता ताई केवळ एक उमेदवार नाहीत, तर त्या घेरडी गटातील प्रत्येक अन्यायाविरुद्ध उठलेला आवाज आहेत.
महिला सक्षमीकरणः महिलांच्या हाताला काम आणि मनात आत्मविश्वास निर्माण करणे.
सत्तेचे विकेंद्रीकरण करून शेवटच्या घटकापर्यंत न्याय
पोहोचवणे.
विकासाची नवी दृष्टीः केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष कृतीवर भर. “हा ‘नारळ” गरिबांना आधार देणारा आहे, हा ‘नारळ” महिलांच्या सन्मानासाठी लढणारा आहे. आणि हाच ‘नारळ” घेरडी इतिहास बदलणारा आहे!” *विजयाचा निर्धारः ‘नारळ” चिन्हासमोरील बटण दाबा ! घेरडीचा आवाज जिल्हा परिषदेच्या सभागृहात ताकदीने पोहोचवण्यासाठी आणि या भागाचा कायापालट करण्यासाठी, ‘नारळाच्या ‘ चिन्हासमोरील बटण दाबून संगिता ताई सोमा मोटे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन आता घराघरांतून उमटत आहे. ही लढाई आता केवळ मतदानाची राहिली नसून, ती घेरडीच्या अस्मितेची आहे.



