आपला जिल्हा

जास्त निधी जिल्हा परिषद मधून अनिल भाऊ मोटे यांनी खेचून आणला – खा.धैर्यशील मोहिते पाटील

अलोट गर्दीत सोलापूर जिल्हा परिषद व सांगोला पंचायत समिती प्रचार शुभारंभ संपन्न. 

सांगोला/ विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सोलापूर जिल्हा परिषद आणि सांगोला पंचायत समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत घेरडी येथे गुरुवारी (दि. २९) प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ करण्यात आला. “माझ्यापेक्षा जास्त निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनिल भाऊ मोठे यांनी आपल्या भागासाठी खेचून आणला आहे, त्यामुळे विकासाची ही गती कायम राखण्यासाठी योग्य उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा,” असे आवाहन माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी यावेळी केले. घेरडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. शुभांगी अनिल मोठे, घेरडी पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री. श्रीनिवास दादा करे आणि सोनंद पंचायत समिती गणाच्य उमेदवार सौ. वर्षा सुरेश गवंड यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी होती. प्रचंड जनसमुदायाचा प्रतिसाद घेरडी येथे संपन्न झालेल्या या प्रचार शुभारंभ सभेला मतदारांनी अलोट गर्दी केली होती. सभेच्या सुरुवातीस अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर माजी सरपंच दिलीप मोठे यांनी आपल्या प्रास्ताविकातून उमेदवारांच्या कार्याचा आढावा घेतला आणि विजयाचा विश्वास व्यक्त केला. या भागाचा कायापालट करण्यासाठी आणि रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सौ. शुभांगी मोठे, श्रीनिवास करे आणि सौ. वर्षा गवंड यांना प्रचंड मतांनी विजयी करा.” यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि वक्त्यांनी विरोधकांचा समाचार घेत, आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. या विशेष कार्यक्रमांसाठी लोकप्रिय खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील उपस्थित होते.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार गट )चे प्रदेश प्रवक्ते महादेव तळेकर, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, तालुका अध्यक्ष दत्तात्रय सावंत, युवानेते महेश नलवडे, माजी सभापती अनिल भाऊ मोटे , जेष्ठ नेते व माजी सरपंच दिलीप मोटे, राजाराम घुटूकडे,कैय्यम अतार ,अमिर आतार अविनाश जगधणे, सुनील भोरफडे,बिरा पुकळे,पोपट पवार शामराव पोळ,केराप्पा देवकाते, तसेच सभेला परिसरातील ग्रामस्थ, तरुण वर्ग आणि महिलांची मोठी उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??