ताज्या घडामोडी

ना वरिष्ठांचा धाक ना कर्तृत्वाचा झेंडा , ग्रामीण भागात भेसळ खोरांचा धंदा.

अन्न व औषध प्रशासनाची बघ्याची भूमिका,या'पाठीमागे दडलंय काय?

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

संपूर्ण राज्यभरात भेसळ खोरावर कारवाईचा बडगा सुरू असून, मात्र सांगोला तालुक्यातील गावांमध्ये दुध डेअरी व्यवसाय, मिठाई व्यवसाय तसेच हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून, अन्न व औषध प्रशासनाने सांगोला तालुक्यात कोठे तरी गुपचुप कारवाई करायची,व इतरांना कारवाई केल्याचा कांगावा करून तेथून धूम ठोकायची,नंतर तालुक्यात व ग्रामीण भागात कधीतरी सवड काढून यायची पध्दत सोलापूर संबंधित अन्न व औषध प्रशासनाकडून होत आहे,असा प्रश्न नागरीकांमध्ये उपस्थित केला जात आहे.तर तालुक्यात काही ठिकाणी भेसळ खोरावर धाड टाकली असून त्यांच्याकडून ही देवाण-घेवाण केल्याचे नागरीकामधूंन बोलले जात आहे.

परंतू असे तर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी जर भेसळ खोरावरती कारवाई करीत नसेल,देवाण -घेवाण होत असेल तर त्या अधिकाऱ्यांची , संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांची चौकशी करून निलंबित करावे ,अशी मागणी सांगोला व ग्रामीण भागातील सुज्ञ नागरिकांमधून होत आहे. अन्न व औषध विभागाच्या अधिकारी यांच्या विरोधात त्रिव नाराजी पसरली आहे.तर एकीकडे शहरात अतिशय अन्न व औषध विभागाचे अधिकारी अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे परंतु सांगोला तालुक्यात नागरिकांच्या आरोग्य विषयी प्रशासन निष्काळजीपणा करत आहे का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. एकीकडे शहरांमध्ये कारवाईचा धुमाकूळ सुरू असून, ग्रामीण भागात मात्र शुकशुकाट मोकाटपणे भेसळयुक्त होत आहे.तसेच अन्न व औषध प्रशासना चे तुकाराम मुंडे यांच्या कामगिरी विषयी सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु सांगोला तालुक्यातील काही गावांमध्ये भेसळयुक्त होणाऱ्या वरती नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांना याच काही देण घेणे नाही. यामध्ये मिळणारा माल आजवर कधीच अन्न औषध प्रशासनाकडून तपासला गेला नाही. यामध्ये मिळणारे विविध खाद्यपदार्थ अगदी बिनधास्तपणे विक्री केली जात आहे, या विकणाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने मोकाट झाले आहेत. यामुळे अनेक आरोग्य विषय प्रश्न निर्माण होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी भेसळखोरांना घाबरतात का? देवाण- घेवाण करित आहेत , हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

म्हणून सांगोला तालुक्यातील नागरिक म्हणत आहे की, ना वरिष्ठांचा धाक नाक कर्तत्वाचा झेंडा , अशी परिस्थिती सोलापूर विभागाचे अन्न व औषध अधिकारी यांची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??