ताज्या घडामोडी

डिकसळच्या सर्वागीण विकाससाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या भाऊसाहेब गेजगे रिंगणात ; ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सांगोला तालुक्यातील डिकसळ ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गावाच्या राहीलेल्या विकासकामाला गती देण्यासाठी आणि डिकसळ सर्वागीण कायापालट करण्यासाठी खंदे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब गेजगे यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे गावातील तरूण वर्ग आणि ग्रामस्थांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

डिकसळ आदर्श गाव बनवणार !

 

गेल्या अनेक वर्षापासून गावातील काही मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. तरूण पिढीला सोबत चेऊन, ज्येछांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डिकसळचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कटिबद्ध आहोत. ग्रामस्थांनी दिलेल्या विश्वासाच्या जोरावर मी ही निवडणूक लढवत आहे.

 

(उमेदवार डिकसळ ग्रामपंचायत)

भाऊसाहेब गेजगे 

 

ग्रामस्थांचा आणि तरुणांचा उदंड प्रतिसाद

 

भाऊसाहेब गेजगे यांच्या उमेदवारीची होताच युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत त्यांच्या उमेदवारींचे स्वागत केले आहे. एका सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सतत संपकांत राहणाव्या नेतृत्वाची गावाला गरज होती, ती आता गेजगे यांच्या रूपाने पूर्ण होईल, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

 

विकासाचा नवा ‘रोडमॅप’ घेऊन मैदानात

भाऊसाहेब गेजगे यांनी नेहमीच गावातील विविध सामाजिक प्रश्नांवर आक्रमकपणे आणि सकारात्मकतेने कामे केले आहे. “केवळ सत्ता मिळवणे हा आमचा उद्देश नसून, डिकसळ तालुक्यातील एक आदर्श आणि डिजिटल गाव बनवणे हेच आमचे एकमेव ध्येय आहे,” असा विश्वास हातेकर यांनी व्यक्त केला आहे.

 

गावाच्या विकासासाठी त्यांनी खालील प्रमुख मुद्द्यांवर भर देण्याचे आश्वासन दिले आहे :

 

पाण्याचा प्रश्न व शेती शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वस्फी उपाययोजना राबवणे.

 

शिक्षण व आरोग्य गावातील जि. प. शाळेचा दर्जा सुधारणे आणि

 

ग्रामस्थांसाठी दर्जदार आरोग्य सुविधा गावातच उपलब्ध करून देणे.

 

तरूणांना रोजगार व क्रीडा स्थानिक तरुणांना स्वयंरोजगारासाठी

 

मार्गदर्शन करुणे आणि गावातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा सुविधा निर्माण करणे.

 

महिला सक्षमीकरण महिला बचत गटांना बळ देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे.

 

पायाभूत सुविधा गावातील अंतर्गत रस्ते, सांबद्ववाण्याची व्यवस्था

 

आणि पथदिव्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??