ताज्या घडामोडी
सांगोला पंचायत समितीच्या माजी सदस्या मंगलताई शहाजीराव नलवडे यांचे निधन

सांगोला/ विशेष प्रतिनिधी विकास गंगणे मो.9881583935
सांगोला पंचायत समितीच्या माजी सदस्या मंगलताई शहाजीराव नलवडे यांचे काल मंगळावर दि. 9 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले. निधना समयी त्यांचे वय 65 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. सांगोला सूतगिरणीचे संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीराव नलवडे यांच्या पत्नी तर शिरभावी गावचे माजी सरपंच अभिजीत नलवडे व साई उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा अमोल मालक नलवडे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार दिनांक ११ रोजी सकाळी 7.30 वाजता शिरभावी येथील त्यांच्या घरासमोरील शेतामध्ये होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.



