ताज्या घडामोडी
विनापरवाना लाकूड तोडणाय्राचा डाव फसला,वनरक्षक मुंडे त्या ठिकाणी हजर

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यातील डिकसळ व जत तालुक्यातील अंत्राळ या डिकसळच्या हद्दीत विनापरवाना लिंबाच्या झाडाची तोड असताना, वनरक्षक मुंडे यांना ही माहिती समजताच त्या ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी करून विचारणा केली असता, लिंबाच्या झाडाची तोड केलेली दिसून आली.ही माहीती सुज्ञ नागरीकांना समजताच सांगोल्याचे वनविभागाचे संबंधित अधिकारी व वनरक्षक मुंडे यांना या विनापरवाना लिंबाच्या झाडाची तोड केलेली माहिती विचारली की, कारवाई कधी होणार परंतु वनविभागाने सांगितले विना परवाना लिंबाचे लाकूड गाडी मधून वाहतूक होत असेल तर कारवाई होणार.अशी माहीती मिळाल्याने आसपासच्या गावातील नागरीकामधूंन संशय व्यक्त केला जात आहे.या पाठीमागे नेमके दडलंय काय अशी ही चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.



