ताज्या घडामोडी

जाणता राजा – छत्रपती शिवाजी महाराज

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

  स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले, शौर्याने लिहिली इतिहास गाथा असा हा जाणता राजा माझा तयाच्या चरणी झुकवितो माथा.

 

ज्या काळात माणसामाणसात भेद केला जायचा. त्या वेळी सर्व जातीधर्मातील प्रजा ही आपली लेकरं आहेत. अशी आपुलकीची वागणूक देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यांवर झाला.

 

असे म्हटले जाते की, बालपणी केलेले योग्य संस्कारच माणसाला घडवत असते. शिवाजी महाराज यांची आई जिजामाता यांनी लहानपणापासून चांगले संस्कार रुजविले होते. जिजामाता छोटया शिवाला महाभारत, रामायण आणि संताची वाणी सांगत असत. शिवाजी महाराज घडविण्याचा सर्वांत मोठं हात जिजामातेचं आहे.

 

वडिलांच्या सामान्य जहागिरीच्या एका तुकड्याचे विस्तीर्ण हिंदवी स्वराज्यात रूपांतर करून दाखविणे आणि तेही अवघ्या पस्तीस वर्षांच्या कालावधीत हे कर्तृत्व खूप अलौकिक आहे.

 

राजा हा प्रजेचा पालनकर्ता असतो, उपभोगी नसतो प्रजेने उभे केलेल्या साम्राज्याचा तो केवळ विश्वास म्हणून धनी असतो.

 

हे तत्व त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणले स्वतःचे राज्य ही कल्पना त्यांना कधीच पटली नाही. राज्य हे प्रजेचे गोरगरीबांचे, साधू संन्यासाचे आहे. या समजुतीनेच त्यांनी कारभार चालवला.

 

महाराज कधीच जातीभेद करीत न्हवते, सर्वांना नियम सारखे होते. परस्त्रियांना आपली माता, बहीण मानत असत. राज्यातील प्रत्येक स्त्रियांचा मान-सन्मान राखत असत. शिवाजी महाराजांकडे सैन्य कमी होते परंतु गनिमी कावा या युद्ध नीतीचा वापर

 

करून मोठ्या शत्रूवरही विजय मिळवला. अनेक किल्ले जिंकले. १६७४ साली रायगड येथे त्यांचा भव्य राज्याभिषेक झाला.

 

आणि ते छत्रपती म्हणून गौरवले गेले, त्यांनी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले आणि मराठी माणसाच्या मनात स्वाभिमान जागवला. अशा युगपुरुषाचे निधन ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर झाले. त्यांनी केवळ गुलामी संपवून स्वतंत्र राज्य दिले नाही, तर स्वाभिमानाने कसे जगावे हे शिकवले. शिवाजी महाराजांचा जीवन आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांचे प्रामाणिकपणा, देशप्रेम आणि धैर्य आपल्यासाठी आदर्श आहे. त्यामुळेच आता शेकडो वर्षे होऊन गेली तरी शिवाजी महाराज यांचे नाव आपण स्वाभिमानाने घेत असतो. जाणता राजा म्हणून ते लोकांच्या हृदयात अमर आहेत. त्यांच्या जन्माने महाराष्ट्राच्या इतिहासाला एक नवीन वळण दिले..

त्या मातीत मिसळावा देह माझा जीवनाचे असे सार्थक व्हावे, चांगल्या कर्माची फळ नको मला मरण फक्त त्या रायगडावर यावे.

 

🛑शुभेच्छा!*शशीकला बाबर

मा .सरपंच डिकसळ ता.सांगोला

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??