निवडणुकीसाठी ग्रामपंचायतींच्या होणार प्रभाग रचना

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यातील, ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २० फेब्रुवारीपासून प्रभाग रचना निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश 5 ग्रामविकास खात्याने दिले आहेत. तालुक्यात ७६ ग्रामपंचायती असून त्यापैकी पाच ग्रामपंचायतींची मुदत ४ जानेवारी रोजी संपली असून त्या ठिकाणी सध्या प्रशासक आहेत. तर ६१ ग्रामपंचायतींची मुदत येत्या २५ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची – नेमणूक करण्याचे आदेश यापूर्वीच – निवडणूक आयोगाने दिलेले – आहेत. तसेच नव्याने बुरलेवाडी 5 ग्रामपंचायत स्थापनेबाबतचे गॅझेट
६७ ग्रामपंचायतींत होणार प्रभाग रचना
प्राप्त झाले आहे.
तालुक्यातील बागलवाडी, गळवेवाडी, राजापूर, सोनलवाडी, सोनंद या ग्रामपंचायतीची मुदत ४ जानेवारी २०२४ रोजी संपलेली आहे. त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक आहे. तसेच आचकदाणी, आगलावेवाडी, अजनाळे, अकोला, आलेगाव, बामणी, भोपसेवाडी, बुद्धेहाळ, बुरंगेवाडी, चोपडी, देवळे, धायटी, डिकसळ, डोंगरगाव, एकतपूर, गायगव्हाण, घेरडी, गौडवाडी, हटकर मंगेवाडी, हलदहिवडी, हंगिरगे, हनुमंतगाव, हातीद इटकी, जवळा, जुजारपूर, जुनोनी, कडलास, कमलापूर, कटफळ, खिलारवाडी, किडबिसरी, कोळे, लक्ष्मी नगर, लोणविरे, लोटेवाडी, महिम, महूद बुद्रुक, मानेगाव, मांजरी, मेडशिंगी, मेथवडे, नराळे, नाझरे, निजामपूर, पाचेगाव बुद्रुक,
पारे, राजुरी, संगेवाडी, शिरभावी, सोमेवाडी, तरंगेवाडी, तिप्पेहाळी, उदनवाडी, वझरे, वाकी शिवणे, वाकी घेरडी, वाणीचिचाळे, वासूद, वाटंबरे, यलमार मंगेवाडी या ग्रामपंचायतींची मुदत बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी संपणार असून निवडणूक होईपर्यंत त्या ठिकाणी प्रशासक राज्य असणार आहे. तसेच मेडशिंगी गावातील बुरलेवाडी या वाडीस स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा प्राप्त झाला असून याचे गॅझेट प्राप्त झाल्याने येथे स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून प्रभाग रचना होऊन निवडणूक होणार असल्याचे समजते.
गेल्या दोन महिन्यांमध्ये नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या असून आता ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.



