ताज्या घडामोडी

जवळा घेरडी भागात भरदिवसा बेकायदेशीर वाळू उपसा वाहतूक जोमात,तहसीलदार यांनी लक्ष घालण्याची गरज,नारीकांमधून चर्चा

सांगोला/ विशेष प्रतिनिधी

विकास गंगणे
मो.9881583935

सांगोला तालुक्यातील जवळा घेरडी व आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू असून ,त्या ठिकाणी बांधकामापर्यंत महसुलच्या नाकावरती टिचून बेकायदेशीर भरदिवसा वाळू उपसा, कोणाच्या आशीर्वादाने केला जात आहे?अशी चर्चा सर्वसामान्य नागरीकांमधून होत आहे.नदीपात्रातुन मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने या नद्याची चाळण होत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.नैसर्गीक संपत्तीच्या या होणाऱ्या नुकसानीचे कोणालाच काही देणे घेणे राहील्याची परिस्थितीती निर्माण झाली आहे.अवैध वाळू व्यवसाय म्हणजे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना मंथली हप्ता असल्याने ही यंत्रणा चांगलीच कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.तालुक्यातील सर्वच नद्यांमधून वाळू उपसा अमर्यादित पणे वाळू उपसा होत आहे ,वाळूची मागणी आता प्रचंड वाढली असून,अत्याधुनिक यंत्राणीव्यवसायामध्ये , शिरकाव केला आहे.जे.सी.बी.पोकलेनच्या साह्याने नदीपात्रातील वाळू उपसून हवे त्या ठिकाणी बांधकामापर्यंत शासकीय,व त्या वाळू वसुलदार झीरोच्या मार्फत ही वाळू पाटवली असल्याचे दिसून येत आहे.महसुलला मंथली असल्याने हा,कायदा सुव्यवस्था मोडण्याचे दिसून येते आहे.असे हा प्रकार होत असताना वाळू उपशाला आळा घालण्यासाठी ,ज्या अवैध वाळू उपसा करणार्यांनी मंथली हप्ता नाही दिला तर, कारवाई करतो म्हणायची अशी या महसुलच्या अधिकाऱ्यांकडून होत आहे.मात्र बेकायदेशीर वाळूचा उपसा सुरू असल्याचे चित्र तालुक्यात अनेक ठिकाणी होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे वाळूचा हा व्यवसाय तालुक्यात सर्वत्र वाढीस लागण्यास सरकारी यंत्रणाही तितक्यात जबाबदार असल्याचे दिसून येते.बेकायदेशीर वाळू उपसा करण्यासाठी ,सरकारकडून कठोर नियम केले जात आहे.तरीही या नियमाची अंमलबजावणी या तालुक्यात होत नाही.सांगोला तालुक्यात नद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू असल्याने ,पाणी बरेच दिवस या पात्रात राहते.तर हा वाळू उपसा तात्काळ न थांबविल्यास, दुष्काळ ग्रस्त सांगोला तालुक्यात पिण्यासाठी पाणी देखील नदीपात्रात राहणार नाही.सांगोला तालुक्यात भरदिवसा अवैधरीत्या वाळु उपसा व बेकायदेशीर वाहतूक होत असून,याला आशीर्वाद कोणाचा? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??