माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आघाडीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा:- *उमेदवार रेश्मा खतीब.

सांगोला /विशेष प्रतिनिधी विकास गंगणे मो.9881583935
सांगोला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ यामध्ये भारतीय जनता पार्टी,शेतकरी कामगार पक्ष, माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गट यांनी एकत्र येऊन उभे केलेल्या उमेदवारांना आमचे मार्गदर्शक माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवार दि.३० नोव्हेंबर रोजी मी माझा जाहीर बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे.
तथापि नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले उमेदवार मारुतीआबा बनकर,प्रभाग क्रमांक ९ अ मध्ये निवडणूक लढवत असलेले उमेदवार जुबेर इकबाल मुजावर व प्रभाग क्रमांक ९ ब मधील उमेदवार सौ.दिव्यानी सौरभ दौंडे या उमेदवारांना आम्ही जाहीर पाठिंबा देत असून मतदार बंधू भगिनी यांनी वरील सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन यावेळी अपक्ष उमेदवार रेश्मा खतीब यांनी केले आहे यावेळी शहर विकास आघाडी च्या उमेदवार दिव्यांनी दौंडे यांनी यावेळी रेश्मा खतीब याचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील,जयमालाताई गायकवाड भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, तानाजीकाका पाटील,जुबेर मुजावर, दिव्यांनी दौंडे,अवधूत कुमठेकर,संजय दौंडे,डॉ.परेश खंडागळे,निसार मुलाणी,सलीम मुलाणी,पत्रकार मिनाज खतीब,नासिर खतीब आदी मान्यवर उपस्थित होते.


