आलेगाव वाकी परिसरात वृक्षतोड जोमात,

तालुक्यात नेमके चाललंय काय?
विकास गंगणे/ विशेष प्रतिनिधी मो.9881583935
वनविभागाच्या कृपाशीर्वादाने सांगोल्यापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर, आलेगाव वाणिचिंचाळे ,वाकी परिसरात भरदिवसा, कोणत्याही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना न जुमानता वृक्षतोड भर दिवसा केली जात असल्याची माहिती न सांगण्याच्या अटीवर तेथील एका शेतकऱ्याने सांगितली आहे.बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या कडून मंथली हप्ता घेऊन, बेकादेशीर वाहतूक होत असताना दिसत येत असून, डोळ्यावर पट्टी लावून जणू काय माहीत नसल्याचे सोंगस तालुक्याचे वन विभागात संबंधित अधिकारी व त्यांचे अंतर्गत वनपाल, वनरक्षक व काही कर्मचारी गप्पच बसलेले दिसत आहेत. या पाठीमागे नेमके दडलय काय? या वन भागातील काहींना मंथली मिळत असल्याने सांगोला तालुक्यातील काही गावात तसेच जवळा व घेरडी परिसरात यांच्या कृपाशीर्वादामुळे जास्तीत जास्त दररोज त्यांच्या नाकावरती टिचून वृक्षतोड वाहनातून वाहतूक केलेली दिसत आहे परंतु याकडे जाणून दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. एकीकडे शासनाचा आदेश झाडे लावा झाडे जगवा,शासन प्रत्येक वर्षाला कोट्यावधी रुपये खर्च करून झाडे लावण्यात एक पाऊल पुढे असतात वन्यप्राणी सुरक्षित रहावे म्हणून लाख रुपये खर्च करून पाणवटे तयार ही केले आहेत. त्यामध्ये कागद कधी टाकलेला आहे खराब झाले आहे का? नाही पाणी सोडले आहे का नाही, अशी परिस्थिती असताना वन विभागाकडून कानडोळा केला जात आहे. वनपाल व काही कर्मचारी मंत्री ठरलेली रक्कम व्यापाराकडून प्रत्येक गाडीच्या पाठीमागे जाऊन रक्कम घेत आहेत. परंतु शासनाने या कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला पगार त्यांच्या खात्यावर जमा केला जातो. परंतु याच कर्मचाऱ्याकडून शासनाने दिलेले नियमाचे पालन केल्याची दिसून येत नाही, तरी सांगोला तालुक्यात चाललय तरी काय.. याकडे , वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधींन वेळीच लक्ष घालून त्या कामचुकार व मुजोर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी, चर्चा तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे.
उर्वरित भाग उद्या पहा…



