आहो,पोलीस दादा आमच्या जवळा,घेरडी बस स्टँड जवळ ही लक्ष द्या…….
त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनीं...

सांगोला/विशेष प्रतिनिधी विकास गंगणे मो.9881583935
आम्ही,सर्व विद्यार्थ्यांनी मिळून जवळा व घेरडीला सकाळी,६वा. आमच्या घरातून शाळेला जात असतो, परंतू शाळा सुटल्यानंतर बस स्टँड जवळ आल्यावर काही मुले दारुच्या नशेत येऊन आमच्या बाजूला अरेवाची भाषा करुन, गुटखा खाऊन आमच्या बाजूला पिचकारी ही मारतात, तसेच काही रोड रोमीओ चा ही असाच प्रकार होत आहे की,तो गाडीवर जात असताना ,आम्हा विद्यार्थ्यांनीना बघून मोठ, मोठ्याने हसने,गाडीचा आवाज वाढविणे, विनाकारण हॉर्न वाजविणे हे असे प्रकार घडत असताना,आम्ही शिक्षण घ्यायचे कसे?शाळा सुटल्यानंतर घरी जायचे कसे?बसमध्ये चढत असताना या रोड रोमीओ चा भयानक त्रास होत आहे,तरी पोलीसदादा तुम्ही एकदा तरी जवळा घेरडी बस स्टँड जवळ या, आम्हाला त्रास देणाऱ्या वरती कठोर कारवाई करा, आम्हा विद्यार्थिनी मुलींना शिक्षण घेऊ द्या अशी मागणी विद्यार्थींनी मधून होत आहे.



