आपला जिल्हा

सांगोला नगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू,

पक्षातील इच्छुकांचा उत्साह मात्र वाढला

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

 

सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसतानाही, इच्छुक उमेदवारांनी थंडीतही मतदार संपर्काचा वेग वाढवला असल्याने तालुक्यातील वातावरण तापले आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महापालिकांच्या निवडणुका रखडलेल्या असल्या तरी संभाव्य उमेदवारांनी ‘निवडणुका कधीही लागू शकतात’ हे गृहीत धरून तयारी सुरू ठेवली आहे.

 

गावोगावी गाठीभेटी, लहानमोठ्या बैठकांपासून घरदार संपर्कापर्यंत विविध मार्गांनी उमेदवार आपली ओळख व मतदारांशी नातं बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. थंडी वाढत असली तरी प्रत्येक पक्षातील इच्छुकांचा उत्साह मात्र वाढला आहे. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या नगरपरिषदच्या निवडणुकीत तालुक्यात महायुतीतील फुटीचे चित्र स्पष्ट झाले. शिवसेना शिंदे गटा विरुद्ध भाजप शेकाप दिपक आबा साळुंके गट- अशी लढत दिसून आली. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती सोबतच महाविकास आघाडी देखील पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. नेते जरी बदलले, पक्षांतर झाले तरी काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट व ईतर पक्ष यांचे तालुक्यातील मतदार आजही ठाम असल्याचे चित्र आहे. अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या या पक्षांचे जाळे ग्रामीण भागात मजबूत असल्याने त्यांना कमी लेखणे चुकीचे ठरेल असे कार्यकत्यांचे, मत आहे.

 

चौकट. 

 

 छुप्या युतींची चर्चा रंगतेय

 

सध्या तरी युती आघाड्या जाहीर होत नसल्या तरी छुप्या युतींची हालचाल मात्र

 

पक्की सुरू आहे. गट तटांमधील समीकरणे, ग्रामपातळीवरील

 जातीय व सामाजिक गणिते लक्षात घेता ‘शत्रूचा शत्रू हा मित्र’ अशी भूमिका अनेक ठिकाणी आकार घेत आहे. यामुळे ग्रामीण भागातील वातावरण थंडीतही प्रचंड तापले आहे.

ग्रामपातळीवरील वर्चस्वाचा प्रश्न महत्त्वाचा

या निवडणुकांतून गावोगावी नेतृत्वाचे

 

 

चौकट. 

 

औपचारिक घोषणेची प्रतीक्षा

 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा कधी होईल हे अद्याप स्पष्ट नसले तरी इच्छुक उमेदवारांना मतदारांशी सतत ‘संपर्क चालू ठेवावा लागेल, कारण निवडणुका अचानक लागू शकतात,’ असे एका इच्छुक उमेदवाराने सांगितले. न्यायालयीन प्रक्रियेचा अडसर कायम असला तरी जत तालुक्यात निवडणूकपूर्व वातावरण रंगायला लागले आहे. थंडी वाढली तरी राजकीय तापमान मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे.

 

वर्चस्व ठरणार असल्याने स्थानिक पुढारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्हीकडे ‘ही निवडणूक हलक्यात घेता येणार नाही’ अशी भावना स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक गावात राजकीय चर्चा आणि गणितांची गरमी वाढू लागली आहे. नगरपालिकेचा निकाल तसेच संभाव्य जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील राजकारण काय रंग घेईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??