घेरडी गावात सार्वजनिक मुतारी नसल्याने महीला व नागरीकांचे गैरसोय; प्रशासनाचे दुर्लक्ष, मा.सभापती श्री.अनिल मोटे, सह ग्रामस्थ आक्रमक.

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो9881583935
सांगोला तालुक्यातील घेरडी गावात महिलांसाठी सार्वजनिक मुतारी व शौचालयाची सोय नसल्याने येथील नागरिकांना आणि प्रवासी महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
घेरडी हे जिल्हा परिषद गटाचे मुख्य ठिकाण असून वर्दळीचे गाव आहे. येथे दररोज शेकडो प्रवाशांची ये-जा असते. मात्र गावात महिलांसाठी एकही सार्वजनिक मुतारी नसल्याने विशेषतः महिला प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. उघड्यावर जावे लागत असल्याने महिलांना लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा केला जात असताना प्रत्यक्षात घेरडी सारख्या मोठ्या गावात साधी मुतारी देखील नाही. घेरडी हा जिल्हा परिषदगट असून सुद्धा विकासापासून वंचित राहिला असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक मुतारी व शौचालयाचे बांधकाम करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने मुतारीची व्यवस्था करावी अशी ग्रामस्थांची अग्रणी मागणी जोर धरत आहे.



