ताज्या घडामोडी

घेरडी आठवडा बाजारात वाहतूक जाम ,नि’पोलिस लांब, पण ….

वसुलित व्यस्त.

सांगोला विशेष प्रतिनिधी विकास गंगणे  मो.9881583935

घेरडी गावचा आठवडा बाजारात सोमवार या दिवशी असून या चौकातून जत, मंगळवेढा, सांगोला जाण्यासाठी वाहनांच्या मोठ मोठ्या रांगा लागलेल्या असतात ,बस स्टँडच्या समोर टू व्हीलर रस्त्यात व चौकात आडवे लावलेले असतात,तसेच व्यापारी देखील भर रस्त्यावर असल्याने चौकातून जात असताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे,परंतू या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे घेरडीत पोलिस मात्र मंथली हप्त्याला आधी.पण कामाला कधी?असा चर्चेचा विषय बनला आहे.परंतू पोलिसांना घेरडी भागातील वाहतूकीचा प्रश्न गंभीर नसून,मंथली साठी खंबीर आहेत.तसेच या पोलिस दादांच्या आशीर्वादाने अवैधरीत्या दारू धंदे वाल्यांना अच्छे दिन आल्याने ,या भागातील पोलिसांनी अवैधरीत्या दारू धंदे वाल्यांना हाताशी जवळ धरून,त्या धंदे वाल्या कडून मंथली घेणेसाठी घेरडी व अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हे फेरफटका मारत असल्याचे दिसून येत आहे.परंतू घेरडी औट संबंधित पोलिसांच्या नावाने एक हाताशी धरलेला झिरो पठाणी वसुली करण्याचा सपाटाचा लावला आहे. या संबंधित अधिकाऱ्याला अवैधरीत्या दारूच्या संदर्भात विचारणी केली असता, व उडवीची उत्तर देतो, या संबंधित अधिकाऱ्यांना आवर घालणार कोण? अशी चर्चा या भागातील नागरिकांमधून होत आहे. तरी घेरडी आठवडा बाजारातील गर्दी पाहून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी चर्चा ही होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??