जवळा घेरडी बनली अवैध दारु व जुगाराचे केंद्र ? पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचे गंभीर प्रश्न
दारू अड्ड्यांवर कारवाई केवळ दिखावू?

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यातील जवळा घेरडी गाव सध्या अवैध दारू व्यवसाय व जुगार अड्ड्यांचे केंद्र बनत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. गावातील गल्लोगल्ली हातभट्टी दारू, सिंधी तसेच डुप्लिकेट दारूचे मोठ्या प्रमाणात अड्डे सरू असून, याक डे पोलीस जाणूनबुजून दुर्लक्ष का?करित आहेत . प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याची भावना नागरीकामंधून व्यक्त केली जात आहे.
घेरडी पोलीस बीटचे पी एसआय राऊत व त्यांची टीम हे वेळोवेळी घेरडी गावात गावात भेट देतात. मात्र या भेटी केवळ कशासाठी असतात, अवैधरीत्या धंदे जोमात आहेत,त्यांची काही मंथली देवाण-घेवाण तरी नाही ना?असल्याचा आरोप जवळा व घेरडी परिसरातील सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.
पोलीस प्रशासनाला आत्ता तरी घाम फुटेल का?
घेरडी येथील सुजाण नागरिक यांनी यावेळी तीव्र शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. गावात उघडपणे अवैध दारू विक्री व जुगार सुरू असताना पोलीस प्रशासन शांत का आहे? वरिष्ठ अधिकारी पीआय घुगे साहेब आणि संबंधित पोलीस या अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, जर प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
अवैध धंदे प्रत्यक्षात, कोणतीही ठोस कारवाई होत नाही .राजरोसपणे दारु धंदे सुरूच आहेत. शासनाकडून मोठा पगार, लाल दिव्याची गाडी आणि ग्रामस्थांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे.वर्दी असताना देखील जर अवैध व्यवसायांवर कारवाई होत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? असा सवाल नागरीकामंधून होत आहे.
भाग.नं.२ उद्या वाचा..



