आपला जिल्हा

शिक्षक भारती आश्रमशाळा विभागात शशिकला कसबे यांची तालुकास्तरीय नियुक्ती

सांगोला : विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सोलापूर जिल्हा शिक्षक भारती आश्रमशाळा विभागाच्या सांगोला तालुका महिला संघटकप्रमुख पदावर श्रीम. शशिकला वसंतराव कसबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आश्रमशाळा डिकसळ येथे कार्यरत आहेत.

 

या नियुक्तीपत्रात शिक्षक भारतीच्या संघटन बांधणीला बळकटी देणे, संघटनेचा प्रसार व प्रचार करणे तसेच शिक्षण, समता, प्रतिष्ठा, संधी व सत्ता प्रत्येकाच्या वाट्याला यावी या उद्देशाने लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समतावादी आणि विज्ञानाभिमुख समाजरचनेसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे व संघटनेच्या धोरणानुसार पार पाडाल, असा विश्वास व्यक्त करत या पदाचा कालावधी एक वर्षासाठी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

ही नियुक्ती विकास धसाडे (जिल्हाप्रमुख), शिक्षक भारती आश्रमशाळा विभाग, सोलापूर जिल्हा यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली असून, कसबे यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??