आपला जिल्हा

राजकीय दबाव असले, तरीही मी मागे हटणार नाही.

▪️शुभांगी अनिल मोटे▪️ घेरडी जिल्हा परिषद गट उमेदवार. 

सांगोला विशेष प्रतिनिधी

विकास गंगणे

मो.9881583935

 

आमची ही लढत अप्रत्यक्षपणे आहे, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे ही लढत आम्ही संपूर्ण ताकदीने, निष्ठेने आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आहोत. निकाल काहीही असो, प्रयत्नात कसलीही कमी राहू देणार नाही. माझा मान-अपमान, प्रतिष्ठा, कामातील प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान यावर कोणताही आघात होऊ देणार नाही, ही माझी ठाम भूमिका आहे.

 

तुमचा हक्क आणि तुमचा आवाज म्हणून मी सदैव सज्ज आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, मोठे राजकीय दबाव असले, तरीही मी मागे हटणार नाही. या लढ्यात काही जिव्हाळ्याची माणसे माझ्या सोबत ठामपणे उभी राहतील, तर काही भीतीपोटी किंवा परिस्थितीमुळे मागे हटतील—हे मला मान्य आहे. पण मी स्वतः मात्र लढा देणारा आहे, आणि जिंकण्याचा निर्धार करूनच मैदानात उतरलो आहे.

 

या संपूर्ण प्रवासाला मला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळते. जेव्हा अफजलखानासारखा बलाढ्य शत्रू प्रचंड फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला, तेव्हा महाराजांनी मोजक्या मावळ्यांसह केवळ स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वराज्याच्या मूल्यांसाठी आणि इतिहास घडवण्यासाठी तो लढा दिला. त्याच विचारांनी प्रेरित होऊन, आज माझ्याकडे जनतेला देण्यासाठी मोठी साधने नसतीलही; पण माझ्या आयुष्यातील अमूल्य वेळ, प्रामाणिक कष्ट आणि निष्ठा मी या लहानशा स्वराज्याच्या उभारणीसाठी देत आहे.

 

माय-बाप जनतेकडे माझी एकच विनंती आहे—तुमचा विश्वास आणि एक संधी. उद्या जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तुम्ही अभिमानाने सांगाल की, एवढ्या मोठ्या नेत्यांच्या आणि ताकदवान विरोधकांच्या पार्श्वभूमीवरसुद्धा, एका साध्या गावातून एक तरुण उभा राहिला आणि त्याने करून दाखवले. तो क्षण सांगताना तुमच्या डोळ्यांत माझ्या या छोट्या अस्तित्वासाठी अभिमानाचे अश्रू नक्कीच असतील.

 

माय-बाप, मला तुमचा आधार हवा आहे.

सौ.शुभांगी अनिल मोटे

जिल्हा परिषद घेरडी गट

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??