घेरडी गटातून सौ.शुभांगी अनिल मोटे यांचीच जोरदार चर्चा..
घेरडी भागातून परिवर्तनाची ज्योत पेटवणारी महिला :- सौ.शुभांगीताई मोटे

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
घेरडी जिल्हा परिषद गटातून घेरडी गावचे माजी: सभापती अनिलभाऊ मोटे यांच्या पत्नी सौ.शुभांगीताई मोटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरून, तुतारी या चिन्हावर निवडणूकीसाठी सज्ज झाल्या आहेत.सध्या घेरडी जिल्हा परिषद गटात शुभांगीताई मोटे यांच्याच नावाची जोरदार चर्चा रंगली आहे.
आजच्या काळात बेरोजगारी ही मोठी समस्या बनली आहे. अनेक युवक-युवती शिक्षण पूर्ण करूनही रोजगाराच्या संधींपासून वंचित राहतात. काम नसल्यामुळे काही तरुण सोशल मीडियामध्ये गुंतून पडताना दिसतात. अशा परिस्थितीत स्वतःच्या हितापेक्षा समाजहिताला प्राधान्य देणारे काही लोक आशेचा किरण ठरतात. अशाच समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे सौ.शुभांगी मोटे आणि त्यांचे पती अनिल मोटे.
“केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे” या उक्तीप्रमाणे कार्य करणारे मोटे दांपत्य समाजसेवेच्या क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करत आहे. स्पर्धात्मक युगात स्वतःची प्रगती साधतानाच समाजातील इतर घटकांनाही पुढे नेण्याची त्यांची धडपड समाजात सकारात्मक बदल घडवते आहे.
▪️ग्रामीण भागातून समाजसेवेची वाटचाल▪️..
अनिल मोटे यांचा जन्म घेरडी गावात एका सामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव होती. शिक्षणापासून वंचित राहणारी मुलं, शेतकऱ्यांच्या अडचणी, बेरोजगारीशी झुंजणारी तरुणाई या सगळ्या गोष्टी त्यांना सतत अस्वस्थ करत. उद्योग-व्यवसायात यश मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या जन्मभूमीच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिले.
शिक्षण आणि रोजगारासाठी भरीव योगदान घेरडी पंचक्रोशीतल्या अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांनी आर्थिक मदत करून शिक्षणाची गंगा वाहती ठेवली. पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली. तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. याशिवाय दुग्ध व्यवसायासाठी गाई घेण्यास आर्थिक मदत करून अनेक युवकांना स्वतःच्या पायावर उभे केले.
▪️दुष्काळग्रस्त भागात मानवतेचा झरा▪️….
घेरडी आणि आसपासच्या गावांमध्ये वारंवार भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या समस्येवर त्यांनी मोफत पाणी वाटप हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला. पिण्याच्या पाण्यासाठी माता-भगिनींना करावी लागणारी वणवण या उपक्रमामुळे कमी झाली. कोणताही स्वार्थ न ठेवता लाखो रुपये खर्च करून त्यांनी माणुसकीचा खरा अर्थ दाखवून दिला.तरुणांसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व“जिथे गरज तिथे अनिलभाऊ मोटे” हे जणू सूत्रच बनले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक समाजकार्यात सक्रिय झाले आहेत. त्यांचे जीवन समाजासाठी झिजणाऱ्या दीपस्तंभासारखे आहे.
महिला सक्षमीकरणासाठी सौ.शुभांगी मोटे यांची धडपड अनिल मोटे यांच्यासोबतच शुभांगी देखील समाजकार्यात सक्रिय आहेत.



