जवळ्यात तहसिलदारांच्या गाडीवर वाळूमाफीयाकडून दगडफेक ” गाडीच्या फोडल्या काचा.

सांगोला / विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यातील नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी महसूल विभागाला येत असुन, त्याच अनुषगांने सांगोला मंडलचे मंडल अधिकारी महेश जाधव ,मेडशिंगी तलाठी मयुर गोडसे, व वाढेगांव कोतवाल समाधान सुर्यगंध बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारासअवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर कारवाईसाठी मौजे जवळा येथील पांढरे वस्तीजवळ नदीपात्रामध्ये अवैध गौणखनिज रोखणेकरीता गेले असता श्री. अतुल शंकर गावडे व इतरानी मिळून तहसिलदार सांगोला शासकीय गाडी क्र एमएच ४५ एएल ८१७१ हे वाहन दगडफेक करून वाहनाची तोडफोड व मोठया प्रमाणात नुकसान केले आहे. सदरची बाब ही गंभीर स्वरुपाची असून शासकीय कर्मचारी यांचे जिवीतास धोका निर्माण करणारी आहे. त्यामुळे सदर आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करणेत याबी. सदर आरोपीवर जोपर्यंत बीएनएस २०२३ मधील कलम १३२, ११८, ३५२, ३५१ अन्वये गुन्हा दाखल करून कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होत आल्याची माहितीमहसूल कर्मचारी संघटनेने तहसिलदार बाळुताई भागवत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर सहाय्यक महसूल अधिकारी सचिन कुंभार राजु बनसोडे व इतर १४ सहाय्यक महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या सहया आहेत .



