सांगोला येथे उद्या शेतकरी कामगार पक्षाची ‘विचार विनिमय बैठक’.

सांगोला /विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला येथील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उद्या रविवारी, ८ मार्च रोजी एका महत्त्वपूर्ण ‘विचार विनिमय’ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक सांगोला येथील भाई गणपतराव देशमुख सहकारी सूतगिरणीच्या आवारात दुपारी १ वाजता संपन्न होणार आहे. सदर बैठकीला आमदार डॉ बाबासाहेब देशमुख मार्गदर्शन करणार आहेत.शेकाप पक्षाची पुढील वाटचाल आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी या बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन पक्ष संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीच्या माध्यमातून आगामी काळातील राजकीय आणि सामाजिक रणनीतीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.



